महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली आहे. मुश्ताक अली स्पर्धेत तो उत्तर प्रदेशचे नेतृत्व करत आहे.
झारखंडविरूद्धच्या सामन्यात भुवनेश्वरने आपल्या तिखट गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डावाच्या १७ व्या डावात त्याने सलग तीन विकेट हॅट्ट्रिक घेतली. त्याने पहिल्या चेंडूवर रॉबिन मिनेसला बाद केले, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बालकृष्णला बाद केले. त्याचवेळी तिसऱ्या चेंडूवर त्याने झारखंडच्या विवेकानंदला आपला बळी बनवले. रॉबिनने ११ धावा केल्या. तर इतर दोन फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले.
मॅचमध्ये काय झाल?
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशने २० षटकात १६० धावा केल्या. रिंकू सिंगने २८ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात झारखंडचा संघ १५० धावांवर सर्वबाद झाला. यामुळे उत्तर प्रदेशने सामन्यात झारखंडचा १० धावांनी पराभव केला.
हेही वाचा :