Bhairappa : कन्नड कांदबरीकार एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाने साहित्य विश्वात शोककळा

Bhairappa

बंगळूर : प्रतिनिधी :  प्रसिद्ध कांदबरीकार आणि ज्येष्ठ विचारवंत सरस्वती सन्मान आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते, एल. एल. भैरप्पा यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांना हदृयविकाराचा झटका आला. पण उपचार सुरू असताना  बंगळूरमधील खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वात शोककळा पसरली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या निधानबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धाजंली वाहिली. (Bhairappa)

त्यांच्यात अशक्तपणा आल्याने तीन दिवसापूर्वी त्यांना बेंगळुरमधील हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले होते. बुधवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. शुक्रवारी म्हैसूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Bhairappa)

भैरप्यांनी कन्नडमध्ये २५ कादंबर्‍यांचे लेखन केले. त्यांचे कथासंग्रह, आत्मचरित्र, तत्त्वज्ञानविषयक पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक कादंबर्‍यावर कन्नडमध्ये चित्रपट बनले. त्यांच्या कादंबर्‍यांचा मराठी, हिंदी, इंग्रजीसह इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. पर्व, काठ, धर्मश्री, तडा, आवरण, वंशवृक्ष या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या. त्या मराठीमध्येही अनुवादित आहेतसाहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २०१० मध्ये सरस्वती सन्मान, १९७५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि २०२३ मध्ये पद्मभूषण यासह अनेक महत्त्वाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. (Bhairappa)

Related posts

विद्यार्थ्यांनी ग्रंथांना गुरू करावे : वासुदेव कुलकर्णी

‘धुरंदर: द रिव्हेंज’ चा ११ दिवसात १३५० कोटींचा गल्ला

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक