Bangladesh : बांगलादेशचा विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत फलंदाजांच्या अपयशानंतरही गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करून बांगलादेशला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात २७ धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. (Bangladesh)

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. बांगलादेशने २० षटकांत ७ बाद १२९ धावा केल्या. बांगलादेशची अवस्था १७ व्या षटकामध्ये ७ बाद ८८ अशी झाली होती, तेव्हा संघाचे शतक पूर्ण होण्याबाबतही साशंकता होती. तथापि, तळातील शमिम हुसैनच्या फटकेबाजीमुळे बांगलादेशला सव्वाशे धावांचा टप्पा ओलांडता आला. शमिमने १७ चेंडूंमध्ये प्रत्येकी २ चौकार व षटकारांसह नाबाद ३५ धावा फटकावल्या. विंडीजच्या गुडाकेश मोतीने दोन विकेट घेतल्या. (Bangladesh)

हे सहज पार करता येण्याजोगे आव्हानही विंडीज संघाला झेपले नाही. रॉस्टन चेस व अकिल हुसैन वगळता विंडीजच्या एकाही फलंदाजास वैयक्तिक ३० धावांचा टप्पा पार करता आला नाही. चेसने ३४ चेंडूंत ३२, तर हुसैनने ३१ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या. बांगलादेशतर्फे तस्किन अहमदने ३, तर मेहदी हसन, रिशाद होसेन आणि तन्झिम हसन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (Bangladesh)

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत