Babasaheb Ambedkar: बाबासाहेबांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान

Babasaheb Ambedkar

Babasaheb Ambedkar

इंग्रजांना भारतातून हाकलून देणे, केवळ याच संकुचित अर्थाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीकडे पाहिले गेल्यामुळे भारतीय माणसांच्या व्यापक स्वातंत्र्याचा विचार झाला नाही, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला.‘माझ्या देशातील रुपयाचे अवमूल्यन झाले, त्यास तुमच्या देशाचे धोरण जबाबदार आहे,’ असे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान नाकारता येत नाही.(Babasaheb Ambedkar)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सोमवारी (१४ एप्रिल) १३४ वी जयंती. त्यानिमित्त विशेष लेख…

प्रा. डॉ. गिरीश मोरे

भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संबंध लावला तर अनेकांच्या भुवया उंचावल्या जातील. अविश्वास आणि शंकेच्या नजरेने लोक मांडणी करणाऱ्यांकडे पाहतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, राजकारणी, संविधानकार, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, प्राध्यापक अशा किती तरी भूमिकेतून वावरत होते. त्यांचे अनेक क्षेत्रांतील योगदान मान्य केले जाते मात्र त्यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दुर्लक्षित ठेवले गेले आहे. (Babasaheb Ambedkar)

भारतीयांची मने ही पूर्वग्रहसंस्कारित आहेत. काल्पनिक, चमत्कार आणि अलौकिक बाबींवर विश्वास ठेवणाऱ्या भारतीयांना वास्तव इतिहास पचनी पडत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे जातिव्यवस्थेच्या नजरेतून पाहिल्यामुळे त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी योगदान दिले होते, हे पटवून घेणे अवघड जाते. इंग्रजांना भारतातून हाकलून देणे, केवळ याच संकुचित अर्थाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीकडे पाहिले गेल्यामुळे भारतीय माणसांच्या व्यापक स्वातंत्र्याचा विचार झाला नाही, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला. (Babasaheb Ambedkar)

प्रा. दत्ता भगत यांनी ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान’ या विषयावर एक पुस्तक लिहिल्यामुळे या विषयाला कोंडी फुटली आहे. इतर अनेक स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हातात शस्त्र घेऊन ब्रिटिशांविरुद्ध कधीही बंड केले नाही. त्यांनी टेलिफोनच्या तारा तोडल्या नाहीत. रेल्वेचे रुळ उखडून टाकले नाहीत. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला नाही. असे असले तरी ते भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी कार्यरत होते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी सनदशीर मार्गाने ब्रिटिश हे भारतीयांचे कशाप्रकारे शोषण करीत होते, हे धाडसाने जगापुढे मांडले.

ब्रिटिशांवर प्रखर टीका

ब्रिटिश हे शोषणकर्ते आहेत, ते नोकरशाही आणि इतर खर्चावर भारतीय संपत्तीची वारेमाप उधळपट्टी करीत आहेत, अशी टीका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई विधिमंडळाच्या अधिवेशनात केली होती. ब्रिटिश हे भारतीय लोकांचे आर्थिक शोषण करीत आहेत याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. नामदार गोखले यांच्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळाच्या अधिवेशनात अंदाजपत्रकावर टीका केली. खर्चाच्या आकडेवारीतील उणिवाही दाखवून दिल्या. विधिमंडळातील भाषणामुळे ना. गोखले एका रात्रीत राष्ट्रभक्त झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही ब्रिटिशांच्या धोरणावर हल्ला केला मात्र त्यांना कुणीही राष्ट्रभक्त ठरवले नाही. (Babasaheb Ambedkar)

‘माझ्या देशातील रुपयाचे अवमूल्यन झाले, त्यास तुमच्या देशाचे धोरण जबाबदार आहे,’ असे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान नाकारता येत नाही. स्वातंत्र्य चळवळीकडे संकुचित आणि पूर्वग्रहदूषित भूमिकेतून पाहिल्यामुळे डॉ. आंबेडकर हे त्या काळी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत खलपुरुष ठरविले गेले. (Babasaheb Ambedkar)

मीठावरील कराला आक्षेप

महात्मा गांधी यांनी असहकाराच्या माध्यमातून ब्रिटिशांविरुद्ध चळवळ उभी केली. त्यांनी दांडीयात्रा काढून मिठाचा सत्याग्रह यशस्वी केला. त्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मीठावरील वाढत्या करावर आक्षेप घेतला होता, याची इतिहासात नोंद आढळत नाही. सायमन कमिशन, साऊथबरो कमिशन, गोलमेज परिषद यांच्यापुढे दिलेल्या साक्षीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतीय माणसांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी विचार मांडले. मतदानासाठी इंग्रजांनी घातलेल्या जाचक अटी काढून देशातील सर्व प्रौढांना मतदानाचा हक्क असला पाहिजे, असा क्रांतिकारक विचार मांडला.

हेही वाचा :

छत्रपती राजाराम महाराजांवरील दोन ग्रंथाचे प्रकाशन

भूषण गवई होणार सरन्यायाधीश

Related posts

India’s major decisions: सिंधू करार स्थगित, अटारी चेक पोस्ट बंद

Luxury Goods : महागड्या वस्तू घेताय?… १% टीसीएस लागू

Rajnath : आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू