Australia series : ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ, कॅरीची शतके

Australia series

Australia series

गॉल : श्रीलंकेतील गॉल येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांनी झळकावलेल्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुध्द पहिल्या डावात ३ बाद ३३० धावा केल्या. स्मिथ नाबाद ११० धावांवर खेळत असून कॅरीने आपल्या कारकीर्दीर्तील सर्वोत्तम कामगिरी करताना १३९ धावांची खेळी केली. दोघांनी २३९ धावांची भागिदारी केली. (Australia series)

श्रीलंकेचा पहिला डाव २५७ धावांवर आटोपला. कुशल मेंडिसने नाबाद ८५ धावा केल्या. श्रीलंकेच्या धावांचा पाठलाग करताना दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने तीन बाद ३३० धावा करत ७३ धावांची आघाडी घेतली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चांगली सुरूवात केली, पण फिरकी गोलंदाजीचा प्रभाव जाणवला नाही. २४ धावांवर असताना स्मिथला एलबीडब्लू आऊट दिले होते. रिव्ह्यूमध्ये स्मिथ नाबाद ठरला. त्यानंतर त्याने क्रीजवर नांगर टाकून शानदार शतक झळकावले. त्याने उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह, पूल शॉट मारले. शतकी खेळीत त्याने नऊ चौकार आणि एक षटकार ठोकला. (Australia series)

स्मिथने कामिंदू मेंडिलसला मिड विकेटवर चौकार ठोकत ३५ शतक पूर्ण केले. त्याला साथ मिळाली ती अलेक्स  कॅरीची. पाठदुखीमुळे अनुपस्थितीत असलेल्या जोश इंग्लिशच्या जागी आलेल्या अलेक्स  कॅरीने पाचव्या क्रमांकावर मिळालेल्या संधीचा फायदा घेत ६८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने स्वीपचा फटका मारत शतक साजरे केले. त्यासाठी त्याने ११८ चेंडू खेळला. १५६ चेंडूत त्याने १३ चौकार आणि दोन षटकारासह १३९ धावा केल्या. दिवसअखेर तीन बाद ३३० धावा करत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात चांगलीच आघाडी घेतली आहे.

वॉर्न मुरलीधरन ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा एक डाव २४२ धावांनी दारुण पराभव झाला.

हेही वाचा :

स्टॉइनिसची वन-डेतून तडकाफडकी निवृत्ती

भारताची विजयी सलामी

Related posts

BCCI Tribute

BCCI Tribute : पहेलगाममधील मृतांना आयपीएलमध्ये श्रद्धांजली

Dhoni

Dhoni : पुढच्यावेळी योग्य संघबांधणी महत्त्वाची

BCCI Contracts

BCCI Contracts : श्रेयस, ईशानची वापसी