फॉलोऑनचा धोका टळला

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाच्या पहिला डावातील धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या डावात ९ फलंदाज गमावून २५२ धावा केल्या. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांच्या धाडसी फलंदाजीमुळे भारताने फॉलोऑन वाचवला आहे. यासह रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांनीही शानदार फलंदाजी करत अर्धशतके झळकावली. आकाश २७ धावांवर तर बुमराह १० धावांवर नाबाद आहे. आतापर्यंत दोघांमध्ये १०व्या विकेटसाठी ५४ चेंडूत ३९ धावांची भागीदारी झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. या बाबतीत टीम इंडिया अजूनही १९३ धावांनी मागे आहे. फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला २४६ धावा कराव्या लागल्या. (AUS vs IND Test)

आकाशने चौकार मारून फॉलोऑन वाचवला. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित रोहित शर्मा, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांनी उत्साहात खुर्चीवरून उडी मारून आनंद साजरा केली. आकाश आणि बुमराह जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये परतले भारतीय खेळाडूंनी त्यांना स्टँडिंग ओव्हेशन दिले.
भारताने आज चार बाद ५१ धावांवर खेळण्यास सुरुवात केली. मात्र, लवकरच संघाला रोहित शर्माच्या रूपाने पाचवा धक्का बसला. रोहित १० धावा करून कमिन्सचा बळी ठरला. यानंतर राहुलने जडेजासोबत ६७ धावांची भागीदारी केली. राहुलचे शतक हुकले आणि तो १३९ चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने ८४ धावा करून बाद झाला.

यानंतर नितीश रेड्डी आणि रवींद्र जडेजा यांनी सातव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. नितीश १६ धावा करून कमिन्सच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. यानंतर जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २२वे अर्धशतक झळकावले. तो नववी विकेट म्हणून बाद झाला. त्याला कमिन्सने मार्शच्या हाती झेलबाद केले. जडेजाने १२३ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. (AUS vs IND Test)

यानंतर बुमराह आणि आकाशने धाडस दाखवत भारताला फॉलोऑनपासून वाचवले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार कमिन्सने चार विकेट घेतल्या आहेत. तर मिचेल स्टार्कने तीन विकेट घेतल्या. जोश हेझलवूड आणि नॅथन लायनला प्रत्येकी एक विकेट मिळाली. याआधी सोमवारी यशस्वी चार धावा केल्यानंतर, गिल एक धावा करून, विराट तीन धावा करून आणि पंत नऊ धावा करून बाद झाला.

सामन्यात पावसाचा व्यत्यय

पावसामुळे व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला. लंच ब्रेक दरम्यानही पाऊस पडला होता.

हेझलवूड मालिकेतून बाहेर?

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या पायास दुखापत झाली असून तो मालिकेतील उर्वरित दोन कसोटींना मुकण्याची शक्यता आहे. मंगळवारी, चौथ्या दिवशीचा खेळापूर्वी सराव करताना हेझवूडच्या पोटरीला दुखापत झाली. चौथ्या दिवशी केवळ एक षटक टाकून तो मैदानाबाहेर गेला. त्याच्या तपासण्या करण्यात आल्या असून वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे साहाय्यक प्रशिक्षक डॅनिएल व्हिट्टोरी यांनी दिली. ब्रिस्बेन कसोटीमध्ये हेझलवूडने तिसऱ्या दिवशी विराट कोहलीला बाद केले होते. या मालिकेतील चौथी कसोटी मेलबर्न येथे रंगणार आहे. हेझलवूड मालिकेबाहेर गेल्यास चौथ्या कसोटीत त्याच्याजागी स्कॉट बोलंड, ब्रेंडन डॉगेट व शॉन ॲबॉट यांच्यापैकी एकास ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळेल. (Hazelwood)

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत