AUS vs IND : अॅडलेड कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे. अॅडलेडच्या स्टेडियमवर होणाऱ्या डे-नाईट कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने संघात एक बदल केला आहे. या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. (AUS vs IND)

अॅडलेटवर होणाऱ्या डे-नाईट सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने जोश हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलंडला संघात स्थान दिले आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात जखमी झालेल्या अष्टपैलू मिचेल मार्शला संघात कायम ठेवले आहे.

ॲशेस मालिकेनंतर बोलंडचे पुनरागमन (AUS vs IND)

२०२३ च्या अॅशेस मालिकेनंतर बोलंडने कसोटी संघात पुनरागमन केले आहे. हेझलवूडच्या दुखापतीमुळे अनकॅप्ड गोलंदाज सीन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट यांचा संघात समावेश करण्यात आला. मात्र, ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजी अधिक आक्रमक करण्यासाठी बोलंडचा प्लेइंग-११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. बोलंडसह मिचेल स्टार्क, कमिन्स आणि मार्श यांच्याकडे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी आहे. (AUS vs IND)

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग-११ खालीलप्रमाणे :

उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

 

हेही वाचा :

Related posts

Indian women’s win : भारताचा मोठा विजय

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!