आसारामची प्रकृती खालावल्याने मुलाला भेटण्यास परवानगी

जोधपूर :  जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम आता आपल्या मुलाला भेटू शकणार आहे. गेल्या ११ वर्षांपासून जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामची प्रकृती खालावल्याने गुजरात तुरुंगात शिक्षा भोगत असलेला त्यांचा मुलगा नारायण साई याने वडिलांना भेटण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गुजरात उच्च न्यायालयाने ही मंजूर केली आहे. यासाठी नारायण साईला ५ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. (Asaram Bapu)

आसाराम ११ वर्षांनंतर मुलगा नारायण साईला भेटणार आहे. आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई हे दोघेही लैंगिक शोषण प्रकरणात वेगवेगळ्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. नुकतीच आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाने महाराष्ट्रात उपचारासाठी जाण्याची परवानगी दिली होती. आसारामला उपचारासाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता.

आसारामचा मुलगा नारायण साई गुजरातच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. गुजरात उच्च न्यायालयाने नारायण साई याला वडील आसारामला भेटण्यासाठी काही अटींसह ४ तासांचा अवधी दिला आहे. या बैठकीला आसाराम याच्या कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहणार नाही. मानवतावादी आधारावर ही परवानगी देण्यात आली आहे. नारायण साई पोलिसांच्या देखरेखीखाली विमानाने जोधपूरला येणार असून जोधपूर मध्यवर्ती कारागृहात तो कैदी म्हणून राहणार आहे. (Asaram Bapu)

हेही वाचा :

Related posts

७५ हजारांची लाच मागणाऱ्या नगर भूमापन अधिकाऱ्याला अटक

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Sheikh Hasina : शेख हसीनांना आमच्याकडे सोपवा