रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्‍क : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योगदानात फसवणूक केल्या प्रकरणी भारताचा माजी क्रिकेट खेळाडू रॉबिन उथप्पा याच्याविरोधात अटर वॉरंट जारी केले आहे. रॉबिन हा सेंचुरीज लाइफस्टाइल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा शेअरहोल्डर आहे. (Robin Uthappa)

उथप्पा विरोधात प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त षडाक्षरा गोपाल रेड्डी यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणी उथप्पा विरोधात हा गुन्हा चार डिसेंबर रोजी दाखल करण्यात आला होता. कंपनीकडून दरमहा पीएफचे पैसे कापले जात असले तरी ते त्यांच्या पीएफ खात्यात जमा होत नसल्याचा आरोप कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. ही संपूर्ण रक्कम 23 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत