अलीगड विद्यापीठाला अल्पसंख्याक दर्जा

नवी दिल्ली  वृत्तसंस्था : अलीगढ मुस्लिम विद्यापीठ हे अल्पसंख्यांक असल्याचा दावा करू शकत नाही, हा १९६७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच बदलला. अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे अल्पसंख्यांक आहे की नाही? हे ठरविण्यासाठी आता तीन न्यायमूर्तींचे वेगळे खंडपीठ स्थापन केले जाणार आहे. (Aligarh Muslim University )

Aligarh Muslim University : सर्वोच्च न्यायालयाने आपलीच जुनी भूमिका बदलली

अझीज बाशा विरुद्ध भारतीय संघराज्य या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, की अलीगड मुस्लिम विद्यापीठ कायद्याद्वारे स्थापन झाले असल्यामुळे ते अल्पसंख्यांक दर्जा मिळविण्यासाठी दावा करू शकत नाही. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने आपलीच जुनी भूमिका बदलली. सरकारने नियमन आणि शासन करण्यासाठी आणलेल्या कायद्यामुळे एखाद्या संस्थेला त्यांचा अल्पसंख्याक दर्जा गमावता येणार नाही, असा निकाल सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाने ४:३ अशा बहुमताने दिला. सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी घेतल्यानंतर हे प्रकरण आता तीन न्यायमूर्तींच्या नियमित खंडपीठाकडे पाठविण्याचा निकाल दिला. यामुळे अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे अल्पसंख्याक आहे की नाही? याचा निर्णय घेतला जाईल.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. शुक्रवारी त्यांचा कामकाजाचा शेवटचा दिवस होता. अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या खटल्याची सुनावणी त्यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केली. ज्यामध्ये न्या. संजीव खन्ना, न्या. जेबी पारडीवाला आणि न्या. मनोज मिस्रा यांनी अल्पसंख्याक दर्जा देण्याबाबत खंडपीठ नेमण्याला सहमती दर्शविली. तर न्या. सूर्यकांत, न्या. दीपांकर दत्त आणि न्या. एससी शर्मा यांनी असहमती दर्शविली. २००६ साली अलाहाबाद उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली असताना अलीगड मुस्लिम विद्यापीठ ही अल्पसंख्याक संस्था नसल्याचा निकाल देण्यात आला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली, त्यावर चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी घेतली.

अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा इतिहास

भारतातील प्रमुख विद्यापीठांपैकी एक असे हे विद्यापीठ आहे. याची सुरुवात १८७५ मध्ये झाली. ब्रिटिश काळात केम्ब्रिज विद्यापीठाच्या धरतीवर भारतात अलीगड मुस्लिम विद्यापीठाची उच्च शिक्षणासाठी स्थापना करण्यात आली होती. १८७५ साली सर सय्याद यांनी मुस्लिमांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी ‘मुस्लिम अँग्लो ओरिएंटल स्कूल’ची स्थापना केली. त्या वेळी खासगी विद्यापीठांना परवानगी नव्हती. त्यामुळे आधी शाळेच्या स्वरुपात विद्यापीठ सुरू करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालय आणि १९२० मध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा दर्जा दिला गेला.

हेही वाचा 

Related posts

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव