निवृत्तीनंतर अश्विन भारतात दाखल

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील गाबा कसोटीनंतर रविचंद्रन अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. निवृत्ती जाहीर केल्यानंतर अश्विन मायभूमीत परतला आहे. चेन्नईत पोहचताच अश्विनच्या चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. (Ravichandran Ashwin)

यावेळी बोलताना त्याने आपण अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली याचा खुलासा केला आहे. एएनआयया वृत्तसंस्थेशी बोलताना अश्विन म्हणाला की, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना मी मैदानावर जितका वेळ देऊ शकतो तितका वेळ देण्याचा प्रयत्न केला दिला आहे.

यानंतर त्याला निवृत्ती निर्णय अवघड होता का? असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, मी घेतलेले निर्णय अवघड नव्हता. कदाचित या निर्णयामुळे अनेक चाहते भावनिक झाले असतील. परंतु, माझ्यासाठी ही दिलासादायी आणि समाधानाची बाब आहे. क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार मी अनेक दिवसांपासून करत होतो. त्यामुळे हा निर्णय सहजपणे घेतला. गाबा कसोटीच्या चौथ्या दिवशी निवृत्तीचा निर्णय घेण्याची जाणीव झाली आणि सामन्याच्या शेवटच्या दिवशी माझा निर्णय जाहीर केला.  (Ravichandran Ashwin)

चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर घेतल्यानंतर २४ दिवसांत अश्विन भारतात दाखल झाला. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी आणि चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केले.

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत