एसेमोग्लू, जॉन्सन, रॉबिन्सन यांना अर्थशास्त्राचा नोबेल जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने २०२४ चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन यांना आज (दि.१४) संयुक्तपणे जाहीर केले आहे. “संस्थांची निर्मिती आणि त्याचा आर्थिक समृद्धीवरील परिणाम” या विषयावरील अभ्यासासाठी त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल देण्यात आल्याचे  रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने जाहीर केले. (Nobel Prize)

यंदाच्या अर्थशास्त्रातील नोबेल विजेत्यांनी त्यांच्या संशोधनातून राष्ट्रांमधील समृद्धीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन यांनी देशाच्या समृद्धीसाठी सामाजिक संस्थांचे महत्त्व जगाला पटवून दिले आहे. लोकसंख्येचे शोषण करणाऱ्या संस्था अधिक चांगल्यासाठी वाढ किंवा बदल घडवून आणत नाहीत, असे देखील या संशोधनात म्हटले आहे.

जगातील 20 टक्के देश हे सर्वात श्रीमंत आहेत. ते जगातील सर्वात गरीब २० टक्के देशांपेक्षा ३० पटीने श्रीमंत आहेत. सर्वात श्रीमंत आणि गरीब देशांमधील उत्पन्नातील तफावतही कायम आहे. तुलनेत जरी सर्वात गरीब देश श्रीमंत झाले असले तरी, ते सर्वात समृद्ध देशांची बरोबरी करू शकत नाहीत. का ? तर यंदाच्या संशोधनातून एक नवीन बाब समोर आली आहे ती म्हणजे दोन्ही देशातील समाजातील संस्थांमधील फरक, असे देखील यंदाच्या अर्थशास्त्र विजेत्यांनी त्यांच्या संशोधनात मांडले आहे. ( Nobel Prize)

१९६९ पासून दिले जाते अर्थशास्त्राचे नोबेल

आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अर्थशास्त्रातील स्वेरिजेस रिक्सबँक पुरस्कार दिला जातो. . Sveriges Riksbank ने १९६८ मध्ये पारितोषिकाची स्थापना केली आणि रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसला १९६९ पासून आर्थिक विज्ञानातील पारितोषिक विजेते निवडण्याचे काम देण्यात आले.

हेही वाचा :

Related posts

Sheikh Hasina : शेख हसीनांना आमच्याकडे सोपवा

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले