Accident: उर्मिला कोठारेच्या कारची धडक; मजुराचा मृत्यू

मुंबई : अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे हिच्या कारने दोघा मजुरांना चिरडले. त्यात एकाचा मृत्यू झाला. मुंबईत शनिवारी हा अपघात झाला. कारच्या धडकेत दुसरा मजूर जखमी झाला आहे. उर्मिला या अपघातात किरकोळ जखमी झाली.(Accident)

अपघातप्रकरणी उर्मिलाच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवली पूर्व येथे शनिवारी मध्यरात्री पाऊणच्या सुमारास ही घटना घडली.

कानेटकर यांचे पती आदिनाथ कोठारे यांनी सांगितले की, उर्मिलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Accident)

‘हा अपघात नेमका कसा झाला हे कोणालाच माहिती नाही. उर्मिला कारमध्ये झोपली होती. अपघात झाला त्यावेळी एअर बॅग बाहेर आल्या त्यामुळे ती बचावली,’ असे त्याने सांगितले.

कानेटकर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तिने दुनियादारी, शुभमंगल सावधान आणि ती सध्या काय करते या सिनेमात भूमिका केल्या आहेत. अभिनेता,दिग्दर्शक महेश कोठारे यांचा मुलगा-अभिनेता आदिनाथ कोठारे याची ती पत्नी आहे.

 

हेही वाचा :

मामीने मामाच्या खुनाची सुपारी का दिली?

वाल्मिक कराडला पालकमंत्रिपद भाड्याने दिले

 

Related posts

Congress Protest against ED

Congress Protest against ED: ‘आरएसएस’च्या खात्याचेही ऑडीट करा

National Herald

National Herald: नॅशनल हेराल्ड : नेहरू ते गांधी

Rills star Ravina

Rills star Ravina : रिल्स स्टारकडून पतीचा खून