आपने केली उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्‍क : आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम यादी आज (दि.१५) जाहीर केली. या यादीतून आम आदमीने पक्षाने ३८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (AAP)

भाजपला सोडचिठ्ठी देऊन आम आदमी पक्षात प्रवेश केलेल्या रमेश पहेलवान यांना कस्तुरबा नगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने दिवंगत शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल विरुद्ध संदीप दीक्षित यांच्यात लढत होणार आहे.

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले