आर. अश्विन करतोय टॉम लेथमची ‘शिकार’

पुणे : न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली. कसोटीच्या पहिल्या दिवशी सामन्यावर भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व ठेवले. नाणेफेक जिंकत फलंदाजीला आलेल्या किवी संघाचा पहिला डाव २५९ धावांवर आटोपला. यामध्ये भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने सात तर, आर. अश्विनने तीन फलंदाजांची शिकार केली. यात अश्विनने टॉम लेथमला बाद करत विशेष कामगिरी केली आहे. (R Ashwin)

भारतीय संघाच्या दिग्गज फिरकीपटूंमध्ये आर. अश्विनचा समावेश होतो. आपल्या फिरकीच्या जाळ्यात फलंदाजाला कसे अडकवायचे हे त्याला चांगलेच माहिती आहेत. डावखुऱ्या फलंदाजांना बाद करायचे विशेष कसब त्याच्याकडे आहे. यामुळे सर्वाधिक वेळा डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम आर. अश्विनच्या नावावर आहे. आता पुणे कसोटीत त्याच्या नावावर विशेष कामगिरीची नोंद झाली आहे. (R. Ashwin)

पुणे कसोटीत आर. अश्विनने किवी फलंदाज टॉम लेथनला नवव्यांदा बाद केले आहे. अश्विनच्या गोलंदाजीवर सर्वाधिक वेळेस बाद होणाऱ्या डावखुऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉम लेथम तिसऱ्या स्थानावर आहे. अश्विनच्या फिरकीवर बाद होण्याच्या यादीत बेन स्टोक्स अव्वल स्थानी आहे. इंग्लंडचा खेळाडूला बेन स्टोक्सला आर. अश्विनने १३ वेळा बाद केले आहे. तर या यादीत डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या स्थानी आहे. वॉर्नर ११ वेळा बाद केले आहे. (R. Ashwin)

अश्विनने सर्वाधिक वेळेस बाद केलेले डावखुरे फलंदाज

  • बेन स्टोक्स -१३
  • डेव्हिड वॉर्नर – ११
  • अॅलेस्टर कुक- ९
  • टॉम लेथम – ९
  • जेम्स अँडरसन – ९

सर्वाधिक वेळेस टॉम लेथमला बाद करणारे गोलंदाज

  • स्टूअर्ट ब्रॉड- १०
  • आर अश्विन- ९
  • नॅथन लायन – ५
  • केमार रोच – ५
  • मिचेल स्टार्क- ५

हेही वाचा :

Related posts

Indian women’s win : भारताचा मोठा विजय

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!