Home » Blog » सर्वोच्च न्यायालयाकडून माधुरी हत्तीण प्रकरणी पेटाला २५ हजाराचा दंड

सर्वोच्च न्यायालयाकडून माधुरी हत्तीण प्रकरणी पेटाला २५ हजाराचा दंड

by प्रतिनिधी
0 comments
Supreme Court dismissed the petition regarding Madhuri

कोल्हापूर : प्रतिनिधी : माधुरी हत्तीणीला साखळदंडात ठेवले असल्याने तिला परत वनतारात पाठवा ही पेटा इंडिया प्राणी मित्र संस्थेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच याचिका दाखल करणाऱ्या पेटाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयाच्या निर्णयामुळे माधुरी हत्तीणीचा शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील मुक्काम यापुढे कायम राहिला आहे. (Supreme Court dismissed the petition regarding Madhuri)

माधुरी ला परत आणण्यासाठी कोल्हापुरात जनआंदोलन

माधुरी हत्तीणीची अबाळ होत असल्याची तक्रार झाल्यानंतर तिची रवानगी गुजरातमधील अनंत अंबानी यांच्या वनतारामध्ये करण्यात आली होती. माधुरी हत्तीणीला गुजरात पाठवल्यानंतर कोल्हापूरात संतापाची लाट उसळली. माधुरीला परत आणण्यासाठी जनआंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी नांदणी ते कोल्हापूर अशी पदयात्रा काढली होती. पदयात्रेत हजारो लोक सहभागी झाली होते. माधुरीला परत आणण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू होती. तसेच माधुरीच्या देखभालीसाठी नांदणीतील लक्ष्मीसेन जैन मठानेही तिची देखभाल आणि सोयीसुविधांसाठी यंत्रणा उभारली होती. या यंत्रणेची तपासणी सरकारी समितीने केल्यानंतर माधुरीला परत कोल्हापुरात पाठवण्याचा निर्णय झाला. महिन्याभरापूर्वी गुजरातमधील वनातारामधून माधुरी नांदणीत परतली. तिचे जल्लोषी स्वागत करण्यात आली. (Supreme Court dismissed the petition regarding Madhuri)

सगळे लोक आनंदी असताना तुम्हाला अडचण का ?

दरम्यान पेटाने माधुरीला परत वनतारा मध्ये पाठवावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. माधुरीच्या आगमनाच्यावेळी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे तिला त्रास सहन करावा लागला. ढोल ताशांचा आवाज आणि घोषणांनी तिला त्रास झाला.  तिला पुन्हा साखळदंडात एकाकी जीवन जगत आहे. तिच्या पायांना दुखापत आणि गुडघ्यांना सूज आली आहे. तिला डांबरी रस्त्यांवरुन चालने मुश्कील झाले आहे, असा दावा पेटाने न्यायालयात केला होता. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच्यावेळी ‘सगळे लोक आनंदी असताना तुम्हाला नेमकी अडचण का?’ असा प्रश्न पेटाला करत त्यांची याचिका फेटाळून लावली. तसेच २५ हजार रुपयांचा दंडही करण्यात आला. (Supreme Court dismissed the petition regarding Madhuri)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!