Home » Blog » निवडणूक आयुक्त ३०० खासदारांना का भेटत नाहीत; राहूल गांधींचा सवाल

निवडणूक आयुक्त ३०० खासदारांना का भेटत नाहीत; राहूल गांधींचा सवाल

by प्रतिनिधी
0 comments
Rahul Gandhi stages a sit-in protest at the Akashvani building

नवी दिल्ली : प्रतिनिधी : इंडिया आघाडीने निवडणूक आयोगावर काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर राहूल गांधी आणि प्रियांका गांधींनी आकाशवाणीच्या इमारतीत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विरोधी पक्षातील ३०० हून अधिक खासदारांना निवडणूक आयुक्तांना का भेटू दिले जात नाही असा प्रश्न राहूल गांधी यांनी केला आहे. (Rahul Gandhi stages a sit-in protest at the Akashvani building)

इंडिया आघाडीने संसद मोर्चापासून निवडणूक आयोगावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी  मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोर्चा काढला. मोर्चात काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमुल काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाचे खासदार सहभागी झाले होते. पण दिल्ली पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर कडक बंदोबस्त ठेवला होता. तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर बॅरिकेटस् लावले होते. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. राहूल गांधी मोर्चाच्या अग्रभागी होते. त्यांनी बॅरिकेटस् वर चढून तिरंगा फडकावला. तसेच निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी केली. (Rahul Gandhi stages a sit-in protest at the Akashvani building)

पोलिसांनी मोर्चा थांबवून इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेऊन अटक करण्यास सुरुवात केली. ताब्यात घेतलेल्या खासदारांना बसमध्ये बसवण्यात येत होते. बसमध्ये प्रियांका गांधी आणि राहूल गांधी चढले होते. पण अचानक राहूल आणि प्रियांका गांधींनी बसमधून सुटका करत थेट आकाशवाणी भवनाच्या इमारतीत शिरले. तसेच गेट क्रमांक चार जवळच्या झाडाखाली बसले. त्यांना भेटयासाठी केसी वेणुगोपाल, पवन खेरा, इम्रान प्रतापगढी, श्रीनिवास बीव्ही आकाशवाणी परिसरात आले. तिथे पुन्हा धरणे आंदोलन सुरू केले. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते जमू लागले. गांधी बंधू भगिनीने तिथे ठिय्या मारत आंदालन सुरू केले. (Rahul Gandhi stages a sit-in protest at the Akashvani building)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!