Home » Blog » अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग व कॅनॉईंग स्पर्धेत पंजाब विद्यापीठाचे वर्चस्व

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग व कॅनॉईंग स्पर्धेत पंजाब विद्यापीठाचे वर्चस्व

by प्रतिनिधी
0 comments
Panjab University Dominates Kayaking and Canoeing Competition

सांगली : प्रतिनिधी : भारतीय विद्यापीठे महासंघ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग व कॅनॉईंग (पुरुष व महिला) स्पर्धेत आज ५०० मीटर शर्यतींमध्ये चंदीगडचे पंजाब विद्यापीठ आणि अमृतसरचे गुरु नानक देव विद्यापीठ यांनी दमदार कामगिरी करत वर्चस्व गाजवले.

येथील कृष्णा बोट क्लबमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये आज ५०० मीटर अंतराच्या अंतिम फेऱ्यांमध्ये देशभरातील विद्यापीठांच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य आणि वेगाचे दर्शन घडवले. विविध गटांतील शर्यती अत्यंत चुरशीच्या ठरल्या. चंदीगड विद्यापीठासह महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांनीही या स्पर्धांत चमकदार कामगिरी केली.शिवाजी विद्यापीठाच्या महिला क्रीडापटूंनी कालप्रमाणेच आजही चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करीत के-४ कयाकिंग प्रकारात चौथे स्थान प्राप्त केले. (Panjab University Dominates Kayaking and Canoeing Competition)

स्पर्धेतील ५०० मीटर अंतराच्या विविध गटांतील निकाल अनुक्रमे (कंसात विद्यापीठ व नोंदविलेली वेळ याप्रमाणे) असे: पुरूष गट: सी-१ – प्रिन्स गोस्वामी (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 02:00.61), अक्षय व्ही. (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 02:02.40), पुनित पाल (लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, 02:12.20), साद महंमद पटेल (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 02:14.58),

के-१ – आदित्य सिंग (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 01:56.47), वंश शर्मा (मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ, उदयपूर, 01:58.15), सचिन कचरे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 02:00.37), योगेश सिंग (पाँडिचेरी विद्यापीठ, पुदुच्चेरी, 02:06.20),

सी-२ – मिथुन मधू व मनिंदर सिंग (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 01:55.53), दर्शन मोरे व अल्पेश धुळे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 01:59.09), प्रतीक कसबे व अभिजीत नाईकनवरे (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, 02:02.71), अनिकेत व राजीव (लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब, 02:04.73),

के-२ – लव कुमार व शुभम (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 01:45.31), विकास व सौरव कुमार (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 01:45.78), साहिल ग्यारी व वंश शर्मा (मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ, उदयपूर, 01:48.40), गुरिंदर सिंग व योगेश सिंग (पाँडिचेरी विद्यापीठ, पुदुच्चेरी, 02:04.31).

के-४ – मयांक शर्मा व सहकारी (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 01:31.84), अखिल कुमार शर्मा व सहकारी (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 01:32.86), एल. सन्तोंबा सिंग व सहकारी (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 01:38.02), साहील गायरी व सहकारी (मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ, उदयपूर, 01:38.79).

महिला गट:

सी-१ – रिया चौरसिया (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 02:37.15), रिया (गुरू काशी विद्यापीठ, भटिंडा, 02:38.25), ओ. बिद्यालक्ष्मी देवी (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 02:40.53), अंबेकर अनुष्का (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 02:43.26).

के-१ – चंद्रकला कुशवाहा (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 02:21.20), आंद्रिया पाऊलोज (केरळ विद्यापीठ, 02:22.27), दीव्यांशी रघोर्ते (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, 02:26.65), मोनिका गढवाल (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 02:27.73),

सी-२ – अनु, निक्की (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 02:19.86), संस्कृती शिंगाडे, अनुष्का अंबेकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 02:30.24), ऋतिका कुमारी, रिया (गुरू काशी विद्यापीठ, भटिंडा, 02:37.81), लीना नागवडे, अपेक्षा हजारे (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, 02:51.35)

के-२ – निधी, चंद्रकला कुशवाहा (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 02:06.84), गरिमा, ऋषिता (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 02:12.32), वैष्णवी अबाले, दिव्यांशी रघोर्ते (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, 02:20.21), दीप्ती, जस्मीन (पाँडिचेरी विद्यापीठ, पुदुच्चेरी, 02:25.88).

के-४ – ह्रषिता व सहकारी (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 01:55.53), निधी व सहकारी (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 02:03.85), अल्पना सहानी व सहकारी (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 02:08.83), समृद्धी खोड, अपूर्वा पोकळी, प्रणाली कोपार्डे, श्रुती माने. (Panjab University Dominates Kayaking and Canoeing Competition)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00