Home » Blog » आरबीआयकडून रेपो दर जैसे थे: रुपया वधारला

आरबीआयकडून रेपो दर जैसे थे: रुपया वधारला

by प्रतिनिधी
0 comments
RBI keeps repo rate unchanged; Rupee strengthens

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत आज रेपो दर ५.२५ टक्क्यावर कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सरकारी रोख्यामंधील परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांसाठी गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्याचा उपाययोजना जाहीर केल्यानंतर डॉलरच्या तुलनेत रुपया ५० पैशांनी वधारला आहे. (RBI keeps repo rate unchanged; Rupee strengthens)

मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्त्रालय आणि इराणमधील युद्धविषक तणाव, रशिया युक्रेनकडून सुरू असलेले परस्पर देशांवरील हल्ले यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला चांगलेच हादरे बसले आहेत. कच्च्या तेलाच्या दरामुळे महागाई वाढू लागले असताना आजच्या पतधोरणाकडे सर्वाचे लक्ष होते. तीन ते पाच जून या कालावधीत झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णयाची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजीव मेल्होत्रा यांनी दिली. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दर ५.२५ टक्के कायम ठेवला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे व्याजदरात कोणतेच बदल होणार नाहीत. (RBI keeps repo rate unchanged; Rupee strengthens)

रिझर्व्ह बँकेने सरकारी रोख्यांमधील परदेशी पोर्टफोलिया गुंतवणुकधारकांसाठी गुंतवणुकीचे नियम शिथिल केले आहे. त्यामुळे भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ५० मजबूत होऊन ९५.२४ वर पोहोचला आहे. (RBI keeps repo rate unchanged; Rupee strengthens)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00