Home » Blog » स्मृती इराणी रिटर्न, अमित मालवीय आऊट

स्मृती इराणी रिटर्न, अमित मालवीय आऊट

by प्रतिनिधी
0 comments
BJP's national executive announced

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. लोकसभा निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर बाजूला पडलेल्या स्मृती इराणी यांच् कमबॅक झाले असून राष्ट्रीय इराणी यांना नव्या कार्यकारणीत संधी मिळाली. आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांची पदावरुन गच्छंती झाली आहे. संघाचे आवडते राम माधव यांचेही पुनरागमन झाले आहे तर विनोद तावडे यांच्याकडील राष्ट्रीय सरचिटणीस पद कायम राहिले आहे. (BJP’s national executive announced)

पियुष गोयल राष्ट्रीय कोषाध्यक्ष

स्मृती इराणींकडे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणतेच पद नव्हते. आता त्यांना संघटनात्मक कामाची मुख्य धुरा दिली आहे. राम माधव यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली होती. २०१४ मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये मेहबुबा मुक्ती आणि भाजपची आघाडी करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. विनोद तावडे यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पद हे कायम राखले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे. (BJP’s national executive announced)

आयटी सेल प्रमुखपदाची जबाबदारी दीपक मस्केंच्याकडे

राष्ट्रीय कार्यकारणीतील सर्वात मोठा निर्णय म्हणजे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना त्या पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता छत्तीसगडचे दीपक मस्के यांची नियुक्ती झाली आहे. पक्षाच्या प्रसारमाध्यम विभागाची जबाबदारी खासदार अनिल दुबानी यांच्यावर कायम ठेवली आहे. १३ राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या यादीत सहा महिला नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा वर्मा, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा समावेश आहे. (BJP’s national executive announced)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!