Home » Blog » Nandani : आणू महादेवीला घरी.. दोन लाख कोल्हापुरकरांनी दिली स्वाक्षरी

Nandani : आणू महादेवीला घरी.. दोन लाख कोल्हापुरकरांनी दिली स्वाक्षरी

by प्रतिनिधी
0 comments
Nandani

कोल्हापूर : प्रतिनिधी :  नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला पोलीस बंदोबस्तात गुजरातच्या वनतारामध्ये रवाना करण्यात आल्यानंतर आता लाडक्या महादेवीला परत आपल्या घरी आणण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाक्षरी मोहीम सुरु केली होती. (Nandani)

या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाखहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आपली महादेवी नांदणी मठातच राहिली पाहिजे असा संदेश यानिमित्ताने दिला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी सुरु केलेल्या या स्वाक्षरी मोहिमेला कोल्हापुरकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. आज सकाळी ही पत्रे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी नांदणी येथील मठात महास्वामीजी यांच्या हस्ते स्वाक्षरी  केलेल्या या सर्व फॉर्मचे पूजन करण्यासाठी रवाना झाले. (Nandani)

शनिवारी दुपारी एक वाजता रमणमळा पोस्ट ऑफीस येथून हे सर्व फॉर्म भारताचे राष्ट्रपती महामहीम द्रोपदी मूर्म यांना पाठविण्यात येणार आहेत. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह कार्यकर्ते नांदणी गावात दाखल झाले आहेत या ठिकाणी महा स्वामीजी यांच्या हस्ते पत्रांची पूजन करून पोस्ट कार्यालयाकडे जाणार आहे. नांदणी येथे स्वाक्षरी केलेल्या फॉर्मचे पूजन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी केले. यावेळी दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील, राहूल खंजिरे, जिल्हा परिषद माजी सदस्य शशिकांत खोत, प्रा. महादेव नरके यांच्यासह कार्यकर्ते, नांदणीचे ग्रामस्थ उपस्थित होते. (Nandani)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00