Home » Blog » ‘गोकुळ’च्या रिंगणात तीन माजी आमदार आणि १४ नातेवाईक रिंगणात

‘गोकुळ’च्या रिंगणात तीन माजी आमदार आणि १४ नातेवाईक रिंगणात

by प्रतिनिधी
0 comments
Three former MLAs in the Gokul electoral arena

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी पॅनेलमध्ये थेट लढत होणार आहे. दोन्ही पॅनेलमध्ये तीन माजी आमदार आणि १४ आजी,माजी आमदार आणि खासदारांचे नातेवाईक रिंगणात उतरले आहेत. दोन्ही पॅनेलने तगडे उमेदवार दिले असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. १८ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. (Three former MLAs in the Gokul electoral arena)

महायुतीचे पॅनेल छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या नावाने उतरले आहे. मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व करत आहेत. महायुती पॅनेलच्या विरोधात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी लढत देणार आहे.

माजी आमदार मिणचेकर, आवळे एकमेकांविरोधात लढणार

सत्ताधारी पॅनेलमध्ये माजी आमदार राजेश नरसिंग पाटील, शिवसेनेचे माजी आमदार सुजीत मिणचेकर, काँग्रेसचे माजी आमदार सुजीत मिणचेकर रिंगणात उतरले आहेत. माजी संचालक सुजीत मिणचेकर आणि राजू आवळे अनुसुचित जाती जमाती गटातून एकमेकांविरोधात लढणार आहेत. (Three former MLAs in the Gokul electoral arena)

आजी माजी आमदार, खासदारांच्या नातेवाईकांचा भरणा

सत्ताधारी गटात आजी माजी आमदार, माजी खासदारांच्या नातेवाईकांचा मोठ्या संख्येने भरणा आहे. महायुतीचे नेतृत्व हसन मुश्रीफ महायुतीचे नेतृत्व करत असून त्यांचे चिरंजीव गोकुळचे माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ इतर मागासवर्गीय गटातून लढणार आहेत. शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांचे सख्खे भाऊ माजी संचालक अजित नरके, चुलत भाऊ चेतन नरके सत्ताधारी पॅनेलमधून लढत आहेत. भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी माजी संचालक शौमिक महाडिक रिंगणात उतरल्या आहेत. याशिवाय सत्ताधारी गटातून माजी आमदार पी.एन.पाटील यांचे चिरंजीव राहूल पाटील, माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांचे चिरंजीव माजी संचालक कर्णसिंह गायकवाड, माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे चिरंजीव माजी संचालक अमर पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे चिरंजीव अंबरिषसिंह घाटगे, के.पी.पाटील यांचे चिरंजीव रणजीत पाटील, के.पी.पाटील यांची बहिण अर्चना ए.वाय.पाटील, माजी आमदार भरमू सुबराव पाटील यांचे चिरंजीव दीपक पाटील हे सत्ताधारी गटातून लढत आहेत. माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव विरेंद्र मंडलिक दुसऱ्यांया गोकुळच्या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.

विरोधी सतेज पाटील यांच्या पॅनेलमधून माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहूल देसाई, पी.एन.पाटील यांच पुतणे उदय निवासराव पाटील, माजी आमदार दिनकराव जाधव यांचे चिरंजीव विश्वजीत जाधव रिंगणात उतरले आहेत.

छत्रपती शाहू शेतकरी आघाडीचे उमेदवार असे

सर्वसाधारण गट : राजेश पाटील चंदगड, विश्वास नारायण पाटील करवीर, अरुण डोंगळे राधानगरी, राहूल पाटील करवीर, अजित नरके पन्हाळा, संभाजी रंगराव पाटील करवीर, अजित पांडुरंग पाटील करवीर, विरेंद्र मंडलिक कागल, कर्णसिंह गायकवाड शाहूवाडी, अमरसिंह पाटील पन्हाळा, युवराज पाटील कागल, मदन देसाई भुदरगड, अंबरिषसिंह घाटगे कागल, चेतन नरके पन्हाळा, अशोक चराटी आजरा, रणजीत पाटील भुदरगड, सतीश पाटील गडहिंग्लज, रणजीत पाटील शिरोळ, दीपक पाटील चंदगड, प्रतापसिंह पाटील करवीर. अनुसचित जाती जमाती गट : सुजीत मिणचेकर हातकणंगले, भटक्या जाती,जमाती गट :  विश्वास जाधव. इतर मागासवर्गीय गट : नविद मुश्रीफ कागल. महिला राखीव गट : शौमिका महाडिक करवीर, अर्चना पाटील, राधानगरी.

राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार असे

सर्वसाधारण गट : शशिकांत पाटील चुयेकर करवीर, बाबासाहेब पाटील करवीर, अभिजीत तायशेटे राधानगरी, प्रा. किसन चौगले राधानगरी, राहूल देसाई भुदरगड, बाबासाहेब देवकर करवीर, उदय पाटील करवीर, विश्वजीत जाधव भुदरगड, विद्याधर गुरबे गडहिंग्लज, सचिन घोरपडे भुदरगड, सत्यजीत पाटील करवीर, रणधीर मोरे राधानगरी, विश्वजीत पाटील मुरगुडकर कागल, भिमगोंडा बोरगावे, शिरोळ, विशाल पाटील चंदगड, विश्वासराव इंगवले हातकणंगले, दादासाहेब पाटील सातार्डेकर पन्हाळा, विकास पाटील शाहूवाडी, सुभाष डोंगरे गडहिंग्लज, शहाजी पाटील कागल. महिला राखीव :  अंजना रेडेकर आजरा, भाग्यश्री डोंगळे राधानगरी. इतर मागसवर्गीय गट : शशिकांत खोत, करवीर. अनुसुचित जाती जमाती गट : राजू आवळे. भटक्या जाती,विमुक्त जाती : बयाजी शेळके, गगनबावडा. (Three former MLAs in the Gokul electoral arena)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!