Home » Blog » Panchgange nears danger level : पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे

Panchgange nears danger level : पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे

by प्रतिनिधी
0 comments
Panchgange nears danger level

कोल्हापूर : प्रतिनिधी : दिवसभर धरणक्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला असला तरी बुधवारी सकाळी पंचगंगा नदीने इशारा पातळी पार केली. त्यानंतर पाणी पातळीत वाढ होत असून पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे निघाली आहे. सायंकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ४१.३ फूट इतकी होती. पंचगंगेची धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. दरम्यान केर्ली येथे पाणी आल्याने कोल्हापूर पन्हाळा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून केर्ली, जोतिबा मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. (Panchgange nears danger level)

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून सकाळी धरणाच्या एकूण  स्वयंचलित ७ दरवाजांपैकी ४ दरवाजे बंद झाले. पण सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पाचवा दरवाजा पुन्हा उघाडला असून तीन, चार, पाच, सहा, सात अशा पाच दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

    पंचगंगा आणि कृष्णा नदीत कोयना, वारणा, राधानगरी, दूधगंगा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारशी संपर्क साधल्यानंतर अलमट्टी धरणाचा विसर्ग आज बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून दोन लाख क्यूसेक्स वरुन अडीच लाख क्यूसेक्स करण्यात आला आहे..

जिल्ह्यातील पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी ३९ फुटावर इशारा पातळी मानली जाते. पहाटे पाच वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ३९ फूट झाली असून बुधवारी पहाटेपासून इशारा पातळीवरुन नदीचे पाणी वाहत आहे. सकाळी 10 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी ४० फुटांवर आहे. (Panchgange nears danger level)

      जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- १३.१ मिमी, शिरोळ -९.५ मिमी, पन्हाळा- २९.१ मिमी, शाहुवाडी- ५०मिमी, राधानगरी- ६३.३ मिमी, गगनबावडा- १०९.३ मिमी, करवीर- १८.२  मिमी, कागल- ३३.६ मिमी, गडहिंग्लज- २८ मिमी, भुदरगड- ४३.४ मिमी, आजरा- ४२.२ मिमी, चंदगड- ३९.५ मिमी असा एकूण ३२.२ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे भुदरगड  तालुक्यातील ९,  गगनबावडा ४६, करवीर ५, पन्हाळा ३४ राधानगरी ३० व शाहूवाडी तालुक्यातील १५ अशा एकूण १३९ शाळा बंद ठेवण्यात आल्या. याबाबत जिल्हा स्तरावरुन वारंवार आढावा घेतला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली आहे. (Panchgange nears danger level)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00