Home » Blog » Shivsena Symbal Dispute : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलैला सुनावणी

Shivsena Symbal Dispute : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलैला सुनावणी

by प्रतिनिधी
0 comments
Shivsena Symbal Dispute

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांपूर्वी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली. न्यायालयाने १४ जुलै रोजी सुनावणी घेण्याची तयारी दाखवली आहे. त्याच दिवशी सुप्रिम कोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे. (Shivsena Symbal Dispute)

एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हा देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने याचिका दाखल केली आहे. आज बुधवारी (दि.२) ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती के.विनोद चंद्रन यांच्या अंशिक दिवसाच्या खंडपीठासमोर हा मुदद् उपस्थित केला. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली.

तथापि, खंडपीठाने आंशिक कामकाजाच्या दिवसांमध्ये प्रकरण सूचीबद्ध करण्यास नकार दिला. एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलांनी  असे सादर केले की, ७ मे रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने त्याच प्रकारचा उल्लेख केला असता तातडीने सुनावणीची विनंती फेटाळन लावली होती. तथापि, कामत म्हणाले की न्यायमूर्ती कांत यांच्या खंडपीठाने सुट्ट्यांमध्ये हा मुद्दा नमूद करण्याची परवानगी दिली होती. (Shivsena Symbal Dispute)

कामत यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या ६ मे रोजीच्या आदेशानुसार अधिसूचित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या याचिकेची सुनावणी तातडीने घेण्याची विनंती कली होती.  त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादाच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या आदेशांप्रमाणेच अंतरिम व्यवस्था करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला अधिकृत चिन्हाचा वापर हा न्यायप्रविष्ट मुद्दा असल्याचे जाहीर करण्याचे निर्देश दिले होते.

पण न्यायमूर्ती सुंदरेश यांनी अंशिक कामकाजाच्या दिवसांमध्ये हे प्रकरण सुचीबद्ध करण्यास नकार दिला होता. पण न्यायमूर्ती सुंदरेश यांनी ही याचिक तातडीने घेण्याची गरज का आहे. तेव्हा वकील कामत म्हणाले की, हा लोकांच्या निवडीच्या अधिकाराशी संबधित मुद्दा आहे. कामत यांनी केलेल्या युक्तीवादानंतर खंडपीठाने १४ जुलै रोजी ज्या दिवशी न्यायालय नियमित बैठकीसाठी पुन्हा उघडेल, त्या दिवशी या प्रकरणाची यादी करण्याचे मान्य केले.  (Shivsena Symbal Dispute)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00