नवीन वर्षात २४ सार्वजनिक सुट्ट्या, सात सुट्ट्या बुडाल्या

Public Holidays

कोल्हापूर; प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने २०२५ वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. वर्षभरात २४ सुट्टी मिळणार आहेत. पण पाच सुट्ट्या हे शनिवार आणि रविवारी आल्याने त्या बुडणार आहेत. प्रजासत्ताक दिन, रामनवमी, गुढीपाडवा, मोहरम हे सण रविवारी तर तर बकरी ईद शनिवारी सुट्टी बुडणार आहे. तर पारशी दिन, स्वातंत्र दिन (१५ ऑगस्ट) आणि गांधी जयंती, दसरा (२ ऑक्टोबर) एकाच दिवशी आल्याने दोन सुट्ट्या बुडाल्या आहेत. (Public Holidays)

सार्वजनिक सुट्ट्यांची यादी अशी

प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी,रविवार), शिवजयंती (१९ फेब्रुवारी,  बुधवार), महाशिवरात्री (२६ फेब्रुवारी,  बुधवार),  होळी,धुलीवंदन (१४ मार्च, शुक्रवार),  गुढीपाडवा (३० मार्च,  रविवार),  रमजान ईद (३१ मार्च,  सोमवार), रामनवमी (६ एप्रिल, रविवार),  महावीर जयंती (१० एप्रिल, गुरुवार), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल, सोमवार),  गुड फ्रायडे (१८ एप्रिल, शुक्रवार), महाराष्ट्र दिन (१ मे,  गुरुवार),  बुद्ध पोर्णिमा (१२ मे, सोमवार), बकरी ईद (७ जून, शनिवार),  मोहरम (६ जुलै,रविवार),  स्वातंत्र दिन (१५ ऑगस्ट , शुक्रवार), पारशी दिन (१५ ऑगस्ट, शुक्रवार),  गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट,  बुधवार),  ईद ए मिलाद (५ सप्टेंबर, शुक्रवार),  महात्मा गांधी जयंती, (२ ऑक्टोबर, गुरुवार),  दसरा(२ ऑक्टोबर, गुरुवार), दीपावली अमावस्या (२१ ऑक्टोबर, मंगळवार),  दीपावली पाडवा (२२ ऑक्टोबर, बुधवार),  गुरुनानक जयंती (५ नोव्हेंबर, बुधवार),  ख्रिसमस (२५ डिसेंबर, गुरुवार).

हेही वाचा :

Related posts

Mitra

Mitra : सांगली, कोल्हापुरातील पूर नियंत्रणासाठी साठवण तलाव बांधा

Shivaji enter semi final

Shivaji enter semi final : शिवाजी तरुण मंडळ उपांत्य फेरीत

UPSC result

UPSC result : मेंढरं चारत असतानाच बिरदेवला फोन आला…