Home » Blog » ZP reservation : आरक्षणानंतर नेत्यांचे ‘महिला’ गटाकडे लक्ष

ZP reservation : आरक्षणानंतर नेत्यांचे ‘महिला’ गटाकडे लक्ष

by प्रतिनिधी
0 comments
ZP reservation

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६९ जागांवर आज सोडतीद्वारे आरक्षण निश्चित झाले. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद महिला गटांसाठी आरक्षण झाल्याने महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या गटांकडे नेतेमंडळीकडून लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. चंदगड तालुक्यातील चारही गटांवर महिलासाठी आरक्षित झाल्याने महिला राज पहायला मिळणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. शक्तीपीठ महामार्ग हा निवडणूकीत चर्चेचा मुद्दा ठरणार आहे. (ZP reservation)

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, तहसीलदार  स्वप्निल पवार यांच्या प्रमुख उपस्थित चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत घेण्यात आली. सर्वप्रथम अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातीसाठी लोकसंख्यानिहाय गटांची घोषणा जिल्हाधिकारी येडगे यांनी केली. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला प्रवर्गासाठी चिठ्ठ्या काढून आरक्षण काढण्यात आले. पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. (ZP reservation)

जिल्हा परिषदेचे आरक्षण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने महिलांसाठी कोणत्या प्रवर्ग आरक्षित होते याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. जे मतदार संघ सर्वसाधारण महिला गटांसाठी आरक्षित झाले आहेत तिथे प्रबळ उमेदवारांची चाचपणी सुरू आहे आहे. जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळीच्या घरातील सदस्यांनी निवडणूकीच्या रिंगणात आणण्याची चर्चा सुरू होती. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विनय कोरे ही जिल्ह्यातील नेतेमंडळी सर्वसाधारण महिला गटातून निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचा शोध घेण्यात येणार आहे. (ZP reservation)

शाहूवाडी तालुक्यातील आंबार्डे, पन्हाळा तालुक्यातील यवलूज, हातकणंगले तालुक्यातील कुंभोज, कोरोची, कागल तालुक्यातील बोरवडे, चिखली, करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ ठाणे, शिंगणापूर, गगनबावडा तालुक्यातील तिसंगी, राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे, सरवडे, भुदरगड तालुक्यातील गारगोटी, पिंपळगाव, कडगाव, गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे हे गट महिला गटासाठी आरक्षित झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी या गटातून निवडून आलेल्या महिला प्रमुख दावेदार राहतील.

तालुकानिहाय गटांचे आरक्षण असे  

शाहुवाडी १. शित्तुर तर्फ वारूण खुला

२. सरूड ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

३. बांबवडे ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

४. आंबार्डे खुला-महिला

पन्हाळा ५. सातवे खुला

६. कोडोली खुला

७. पोर्ले तर्फ ठाणे खुला

८. यवलूज खुला-महिला

९. कोतोली ओबीसी-महिला (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

१०. कळे ओबीसी-महिला (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

हातकणंगले ११. घुणकी ओबीसी-महिला (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

१२. भादोले अनुसुचित जाती-महिला

१३. कुंभोज खुला-महिला

१४. आळते अनुसुचित जाती-महिला

१५. शिरोली पुलाची ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

१६. रूकडी अनुसुचित जाती

१७. रूई अनुसुचित जाती

१८. कोरोची खुला-महिला

१९. कबनूर अनुसुचित जाती

२०. पट्टणकोडोली अनुसुचित जाती

२१. रेंदाळ खुला

शिरोळ २२. दानोळी अनुसुचित जाती – महिला

२३. उदगांव ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

२४. आलास खुला

२५. नांदणी अनुसुचित जमाती -महिला

२६. यड्राव ओबीसी-महिला (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

२७. अब्दूललाट अनुसुचित जाती-महिला

२८. दत्तवाड खुला-महिला

कागल २९. कसबा सांगाव अनुसुचित जाती-महिला

३०. सिध्दनेर्ली ओबीसी-महिला (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

३१. बोरवडे खुला-महिला

३२. म्हाकवे ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

३३. चिखली खुला-महिला

३४. कापशी ओबीसी-महिला (नागरीकांचा मागासवर्ग)

करवीर ३५. शिये ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

३६. वडणगे खुला

३७. उचगांव खुला

३८. मुडशिंगी ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

३९. गोकुळ शिरगांव खुला

४०. पाचगांव खुला

४१. कळंबे तर्फ ठाणे खुला-महिला

४२. पाडळी खुर्द खुला

४३. शिंगणापूर खुला-महिला

४४. सांगरूळ खुला-महिला

४५. सडोली खालसा खुला

४६. निगवे खालसा खुला

गगनबावडा ४७. तिसंगी खुला-महिला

४८. असळज खुला

राधानगरी ४९. राशिवडे बुद्रुक खुला

५०. कसबा तारळे खुला-महिला

५१. कसबा वाळवे ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

५२. सरवडे खुला-महिला

५३. राधानगरी खुला

भुदरगड ५४. गारगोटी खुला-महिला

५५. पिंपळगांव खुला-महिला

५६. आकुर्डे ओबीसी-महिला (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

५७. कडगांव खुला-महिला

आजरा ५८. उत्तूर खुला

५९. पेरणोली खुला

गडहिंग्लज ६०. कसबा नूल ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

६१. हलकर्णी खुला

६२. भडगांव खुला

६३. गिजवणे खुला-महिला

६४. नेसरी खुला

चंदगड ६५. आडकूर खुला-महिला

६६. माणगांव ओबीसी-महिला (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

६७. कुदनूर खुला-महिला

६८. तुडये ओबीसी-महिला (नागरीकांचा मागास प्रवर्ग)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00