नागपूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्णा शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केले. छत्रपती शिवाजी महाराज युद्धाने थकले होते आणि त्यांनी आपले राज्य समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केले होते अशी मुक्ताबळे उधळली. त्यांच्या वक्तव्यांवर विरोधकांनी टीका केली असून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नागपूर येथील जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरातील भारतदुर्गा मंदिराच्या शिलान्यास सोहळ्यात बागेश्वर बाबांनी वक्तव्य केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आरएसएसचे मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. (Bageshwar Baba’s controversial statement regarding Shivaji Maharaj)
यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबा म्हणाले, शिवाजी महाराज थकले होते. त्यांनी मुकुट समर्थ रामदासांना दिला आणि आता माझ्याकडून युद्ध लढले जात नाही. विश्राम हवा आहे, असे सांगितले. तसेच शिवाजी महाराज हे रामदासांचे शिष्य होते असे संबोधून रामदास स्वामींनी गुरु म्हणून शिष्य असलेल्या शिवाजी महाराजांना राज्य चालवण्यास सांगितले. (Bageshwar Baba’s controversial statement regarding Shivaji Maharaj)
त्यांच्या विधानावर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसने बागेश्वर बाबा शास्त्रीला अटक करण्याची मागणी केली आहे. ऐतेहासिक संदर्भाशिवाय अशा कथा सांगणे चुकीचे असल्याचे सांगत इतिहास संशोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बागेश्वर बाबांच्या विधानावर टीका करताना हा शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचा आरोप केला आहे. (Bageshwar Baba’s controversial statement regarding Shivaji Maharaj)