Home » Blog » Protest against Wangchuk’s arrest :  कोल्हापुरात वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीकडून मोर्चा

Protest against Wangchuk’s arrest :  कोल्हापुरात वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीकडून मोर्चा

by प्रतिनिधी
0 comments
Protest against Wangchuk's arrest

कोल्हापूर : प्रतिनिधी : लडाख राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या डॉ. सोनम वांगचुक यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करुन तुरुंगात डांबल्याप्रकरणी इंडिया आघाडीच्यावतीने आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. (Protest against Wangchuk’s arrest)

लेह लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी शिक्षण आणि पर्यावरण तज्ञ डॉक्टर सोनम वांगचुक यांनी लोकशाही मागनि आंदोलन सुरु केले होते. मात्र केंद्र सरकारने २६ सप्टेंबरला त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. यानंतर लेह लडाख मध्ये संचारबंदी जारी करून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.  सरकारच्या या दडपशाहीच्या विरोधात देशभरातून संतापाची लाट उसळलीय. वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात निषेध मोर्चे काढले जात आहे. आज कोल्हापुरातही इंडिया आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. सकाळी दहा वाजता इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने दसरा चौकात जमा झाले. दसरा चौकातून मोर्चास सुरवात झाली. (Protest against Wangchuk’s arrest)

व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आला. मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारुन भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव प्रा. उदय नारकर यांनी डॉ. वांगचुक यांची सुटका केली नाही तर टप्प्याटप्याने आंदोलन तीव्र करु, असा इशारा दिला. त्यानंतर इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना मागण्याचे निवेदन सादर करत डॉक्टर सोनम वांगचूक यांच्या सुटकेची मागणी केली.

आंदोलनात ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, आपचे संदीप देसाई, शेकापचे बाबूराव कदम, माकपचे चंद्रकांत यादव, अतुल दिघे,  दगडू भास्कर, व्यंकाप्पा भोसले, भाकपचे सतीशचंद्र कांबळे, रघू कांबळे, भरत रसाळे, विनायक घोरपडे, उत्तम पाटील, संजय पटकारे, उत्तम पाटील यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. (Protest against Wangchuk’s arrest)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00