नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या तीन दिग्गज खासदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल यांनी पक्षाला रामराम ठोकला. या तीन खासदारांच्या प्रवेशांना आप ला म्हणजेच पर्यायाने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का मानला जात आहे. (Three Aam Aadmi Party MPs join the BJP)
दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबनी यांच्या उपस्थितीत तीन खासदारांनी प्रवेश केला. तत्पुर्वी खासदार राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषद घेऊन आप पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. संविधानाच्या तरतुदीनुसार पक्षाचे राज्यसभेतील दोन तृतीयांश खासदार भाजपात विलीन होत असल्याचे त्यांनी सांगितले. (Three Aam Aadmi Party MPs join the BJP)
काही दिवसापूर्वी राघाव चड्ढा यांची राज्यसभेच्या उपनेते पदावरुन हकालपट्टी केली होती होती. भाजपशी जवळीक वाढल्याने आम आदमी पक्षाने त्यांना हटवल्याचे स्पष्टीकरण दिले होते. राज्यसभेतील दहा पैकी सात आपचे खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा चड्ढा यांनी केला आहे. राघव चड्ढा यांच्यासह स्वाती मालीवाल, हरभजन सिंग, राजिंदर गुप्ता, विक्रम साहनी हे खासदारही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चड्ढा यांनी सांगितले. (Three Aam Aadmi Party MPs join the BJP)