रिद्धिमान साहची क्रिकेटमधून निवृत्ती

वृत्तसंस्था : मायभूमीत क्लीन स्वीप देत न्यूझीलंड संघाने भारताला मोठा धक्का दिला.तीन किंवा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला आपल्या घरच्या मैदानावर असा पराभव स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. बंगळुरू आणि पुणे कसोटी पराभव स्वीकारल्यानंतर मुंबई कसोटीत भारताला २५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.  ही मालिका संपताच भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

रिद्धिमान साहाने सोशल मीडियाच्या माध्यातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रिद्धिमान साहाने सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी हंगामानंतर निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले.  रिद्धिमान साहाने २०१० साली  भारताकडून पदार्पण केले होते. रिद्धिमान साहा २०२१ भारतीय संघापासून दूर आहे. त्याने आयपीएलच्या २०२५ हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलावासाठी आपले नाव दिलेले नाही. यामुळे रिद्धिमान साहा आयपीएल २०२५ मध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

रिद्धिमान साहाची सोशल मीडिया पोस्ट

रिद्धिमान साहाने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. निवृत्ती जाहीर करताना त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.  ‘क्रिकेटमधील सुंदर प्रवासानंतर, हा हंगाम माझा शेवटचा असेल. बंगालचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मला मिळाला, क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी मी रणजी ट्रॉफी खेळणार आहे. या अविश्वसनीय प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मी आभार मानतो.

रिद्धिमान साहाची कारकीर्द

२०१० साली भारतीय संघाकडून पदार्पण केलेल्या रिद्धिमान साहाने कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने १३५३ धावा केल्या आहेत. यात त्याने तीन शतके झकवली आहेत. याशिवाय रिद्धिमानने ९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१ धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वृद्धिमान साहाने १३८ सामन्यांत ७०१३ धावा केल्या आहेत. तर  लिस्ट ए मध्ये  ११६ सामन्यांमध्ये ३०७२ धावा केल्या. त्याने २०११ आणि २०२२ साली आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.  आयपीएलच्या फायनलमध्ये शतक झळकवणारा रिद्धिमान साहा पहिला फलंदाज ठरला होता. त्याने आयपीएलच्या कारकिर्दीत १७० सामन्यांत २९३४ धावा केल्या आहेत.

Related posts

‌Bengal Record : बंगालचा विक्रमी धावांचा पाठलाग

Mohammed Shami : शमीचा समावेश अद्याप दूरच

Tanush Kotian : तनुष कोटियनला ऑस्ट्रेलियाचे तिकीट