woman jumps:आणि तिने रिक्षातून उडी मारली

woman jumps

बेंगळुरू : काय होतेय हे तिच्या लक्षात आले आणि तिने क्षणाचाही विलंब न लावता रिक्षातून उडी मारली. तिला किरकोळ दुखापत झाली. मात्र भयंकर संकटातून ती वाचली. पूर्व बेंगळुरूमध्ये गुरुवारी रात्री तरुणीसोबत हा प्रकार घडला. तिने सांगितलेल्या ठिकाणाऐवजी रिक्षाचालक भलतीकडेच रिक्षा घेऊन जाऊ लागला तेव्हा  तिने निर्णय घेतला. (woman jumps)

महिलेने अधिकृतपणे या घटनेची माहिती पोलिसांना दिली नसली तरी, तिचा नवरा अझहर खानने बेंगळुरू शहर पोलिसांना टॅग करत एक्सवर हा भयंकर अनुभव शेअर केला. रिक्षाचालक नशेत होता, असा दावाही अझहरने पोस्टमध्ये केला आहे.

त्याच्या पत्नीने नम्मा यात्री ॲपद्वारे ऑटो-रिक्षा बुक केली. ती होरामवूहून थानिसांद्र येथील तिच्या घरी जात होती. मात्र रिक्षाचालक नेहमीच्या रस्त्याऐवजी हेब्बलच्या दिशेने जाऊ लागला. तेव्हा काहीतरी गडबड झाल्याचे तिच्या लक्षात आले. वेळ रात्रीची होती. रिक्षा भलतीकडेच का नेतोयस असे तिने अनेकवेळा विचारले. तसेच रिक्षा थांबवायलाही सांगितले, मात्र तो प्रतिसाद देत नव्हता.(woman jumps)

त्यातच रिक्षाचालकाचे तारवटलेले डोळे आणि धुंदी पाहून काहीतरी धोका असल्याचे तिच्या लक्षात आले. खान यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, ‘रिक्षा नागावरा येथे नेली. तेथून त्याने रिक्षा अचानक उड्डाणपुलाकडे वळवली. हा मार्ग पूर्णपणे अनोळखी होता.’(woman jumps)

तिने त्याला रिक्षा थांबवण्यास वारंवार सांगितले. मात्र त्याने दुर्लक्ष करत रिक्षा पुढे दामटली. आपण कसल्यातरी भयंकर खाईत लोटले जाणार असे तिच्या लक्षात आले. उताराला रिक्षाची गती झाल्या झाल्या तिने पटकन रिक्षातून उडी मारली आणि स्वत:ची सुटका करून घेतली, असे खानने सांगितले. सुदैवाने तिला दुखापत झाली नाही.

पण अग्निपरीक्षा तर पुढे होती. ती निसटल्यानंतर चालक तिच्याजवळ आला आणि त्याने तिला परत रिक्षात बसायला सांगितले. मात्र तिने नकार दिला. तिने ऑनलाइन पैसे दिले आणि घरी जाण्यासाठी दुसरी रिक्षा पकडली. (woman jumps)

रात्री नऊच्या सुमारास महिलांना प्रवास करताना एवढे वाईट अनुभव येत असतील तर रात्री उशीरा प्रवास करणाऱ्यांच्याबाबतीत काय होत असेल, याची कल्पना केलेली बरी, असे खान यांनी म्हटले आहे. या घटनेने सोशल मीडियावर लक्ष वेधले. त्यानंतर लगेचच ‘नम्मा यात्री’ने खान यांना प्रतिसाद दिला. आणि झाल्या घटनेची माहिती घेतली. पोलिसांनीही ही घटना गांभीर्याने घेतली.

 हेही वाचा :

खून केला नि मृतदेहाचे तुकडे बॅरेलमध्ये भरले
देशमुख हत्येच्या खटल्यात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची तयारी

Related posts

student death: बर्थ डे पार्टी झाली आणि दुसऱ्या दिवशी…

HMPV Patients :‘एचएमपीव्ही’ किती घातक?

Helicopter crash: कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू