पुढचे काही दिवस कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्याला परतीचा पावसाने झोडपले आहे. भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. हा अलर्ट पुढचे अजून काही दिवस असून, नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेनकोट, छत्री घेउन घराबाहेर पडावेत असाही सल्ला देत खबरदारी घेण्यास सांगितले आहे. पिकाचे अजून नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी काढणीला आलेल्या पिकाची कापणी करण्यास सुरवात केली आहे. (Weather Today)

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे नागरिकांना हैराण केले आहे. शुक्रवार (दि.१८) दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी वर्गाचे भरपूर नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागात गडगडाटासह विजा पडल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. कोल्हापूर शहारासह जिल्हाच्या इतर भागांमध्येही घरावर, शेतात वीज कोसळण्याच्या घटना घडल्या असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Weather Today : पुढचे काही दिवस ऑरेंज अलर्ट 

आज (दि.१९) कोल्हापूर जिल्ह्यात एकूण पाच भागांमध्ये वीज पडण्याच्या घटना घडल्या असून, कोल्हापूर शहरातील नागाळा पार्क भागातील नष्टे हॉलच्या मोबाईल टॉवरवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. तसेच उजळाईवाडी  भागात एका घराच्या छतावर वीज कोसळल्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे. पन्हाळा तालुक्यातील पडळ आणि यवलूज या भागाठी वीज पडण्याची घटना घडली आहे. परंतू यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही .  भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्याला शुक्रवारी (दि.१८) सुरवातीला येलो अलर्ट दिला होता, परंतु दुपारच्या सुमारास त्याचे ऑरेंज अलर्ट मध्ये रूपांतर झाले आहे. ऑरेंज अलर्ट हा पुढचे काही दिवस असण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही वाचा 

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी