जागतिक महासत्तांच्या यादीत भारत

मॉस्को वृत्तसंस्था : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले आहे. भारत आणि रशियामधील सहकार्य सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुतीन यांनी भारत हा एक महान देश असल्याचे सांगून भारताची आर्थिक प्रगती आणि त्याची विशालता लक्षात घेऊन जागतिक महासत्तांच्या यादीत त्याचा समावेश केला पाहिजे, असे सांगितले.

Vladimir Putin : भारत एक महान देश 

रशियातील सोची शहरातील ‘वालदाई डिस्कशन क्लब’ या कार्यक्रमात पुतिन बोलत होते. पुतीन यांनी आपल्या भाषणात सांगितले, की आम्ही भारतासोबत विविध क्षेत्रात आमचे संबंध विकसित करत आहोत. भारत एक महान देश आहे. आर्थिक वाढीच्या बाबतीतही तो प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये प्रमुख आहे. त्याचा जीडीपी ७.४ टक्के दराने वाढत आहे. रशिया आणि भारत यांच्यातील सहकार्य दरवर्षी वाढत आहे. पुतीन यांनी सोव्हिएत युनियनच्या काळापासून रशियाच्या भारतासोबतच्या संबंधांबद्दल सांगितले आणि दोन्ही देशांमधील संबंध अतिशय खास असल्याचे सांगितले. पुतीन म्हणाले, की भारताच्या स्वातंत्र्यात सोव्हिएत युनियनचीही भूमिका होती.

जागतिक महासत्तांच्या यादीत भारताचा समावेश झाला पाहिजे. हा दीड अब्ज लोकसंख्येचा देश आहे आणि जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्याची संस्कृती खूप प्राचीन आहे आणि भविष्यात विकासाची अफाट क्षमता आहे, असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. भारत आणि रशिया संरक्षण क्षेत्रातही सहकार्य वाढवत असल्याचे सांगून ते म्हणाले, की भारतीय सैन्याकडे अनेक रशियन शस्त्रे आहेत. यावरून दोन्ही देशांमधील विश्वास दिसून येतो. आम्ही आमची शस्त्रे भारतालाच विकत नाही तर आम्ही त्यांची एकत्रित रचना देखील करतो.

ब्रह्मोसचा संदर्भ

भारत आणि रशियाने संयुक्तपणे ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकसित केले आहे. भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मॉस्कवा नदी यांची नावे एकत्र करून ब्रह्मोस हे नाव देण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र भारताच्या ‘डीआरडीओ’आणि रशियाच्या ‘एनपीओ’यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.

…………

हेही वाचा 

Related posts

Sheikh Hasina : शेख हसीनांना आमच्याकडे सोपवा

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले