Vishalgad fort : विशाळगडावरील संचारबंदी उठवली

Vishalgad fort

कोल्हापूर : प्रतिनधी : अतिक्रमण बांधकामावरुन पाच महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसक घटनेमुळे पर्यटकांसाठी बंद असलेला विशाळगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेली संचारबंदी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि. १ जानेवारी) शिथिल केली. अटी आणि शर्तीचे पालन करुन पर्यटकांना विशाळगडावर प्रवेश दिला जाणार आहे. (Vishalgad fort)

गेली काही वर्षे विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. गडावरील अनधिकृत बांधकामे हटवावीत, या मागणीसाठी हिंदुत्ववाद्यांनी आवाज उठवला होता. जुलै महिन्यात विशाळगड मुक्तीसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आवाज उठवत आंदोलन पुकारले होते. पण आंदोलनाला हिंसक वळण लागले.  (Vishalgad fort)

विशाळगडाच्या पायथ्यांनी असलेल्या गजापूर गावात हल्लेखोरांनी अल्पसंख्याकांच्या घरावर हल्ला करुन प्रार्थनास्थळाचेही नुकसान केले. याचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यानंतर राज्य सरकारने विशाळगडावर संचारबंदी लागू केली होती. (Vishalgad fort)

विशाळगडावरील सुरू असलेल्या संचारबंदीमुळे विशाळगडाच्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे गडावरील संचारबंदी उठवावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. आता विशाळगड आणि परिसरातील परिस्थिती निवडळली आहे. राज्य सरकारने गडावरील संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही संचारबंदी ३१ जानेवारीपर्यंत उठवली आहे. पर्यटकांना नियम आणि अटी घालून विशाळगडावर जाता येणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पर्यटकांची तपासणी करुनच त्यांना गडावर सोडण्यात येणार आहे.

हेही वाचा :
एकाच नंबरच्या दोन गाड्या… नेमके गूढ काय..?
अदानी मुद्द्यावरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न

Related posts

DYFI activist’s murder : नऊ संघस्वयंसेवकांना का झाली जन्मठेप?

Pakistan wedding : पाकमध्ये सहा भावांचा सहा बहिणींशी विवाह

एकाच नंबरच्या दोन गाड्या… नेमके गूढ काय..?