वृंदावन : भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी अलीकडेच अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली. वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांच्या सत्संगावेळी विराट व अनुष्का उपस्थित राहिले असून यावेळी त्यांची मुले वामिका व आकायही सोबत होती. सोशल मीडियावरून यासंबंधीचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. (Virat, Anushka)
या भेटीवेळी विराट व अनुष्काने प्रेमानंद महाराजांचे आशिर्वाद घेतले. अनुष्काने यावेळी महाराजांसमोर मन मोकळे केले. “मागील वेळी जेव्हा आम्ही आलो होतो, तेव्हा माझ्या मनात काही प्रश्न होते. ते विचारवेसे मी ठरवले होते, मात्र तेव्हा जे कोणी बसले होते, त्यापैकी प्रत्येकाने जवळपास तसेच प्रश्न विचारले. जेव्हा आम्ही इथे येण्याविषयी विचार करत होतो, तेव्हा मी मनातल्या मनात तुमच्याशी संवाद साधत होते. दुसऱ्या दिवशी मी कांती वार्तालाप पाहायचे आणि कोणी ना कोणी तसाच प्रश्न विचारलेला असायचा. तुम्ही केवळ मला प्रेम व भक्ती द्या,” असे अनुष्का या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे. विराट तिच्याशेजारी हात जोडून उभा आहे. (Virat, Anushka)
या दोघांची भक्ती पाहून प्रेमानंद महाराजही भारावले. “तुम्ही खूप धैर्यवान आहात. जगभरामध्ये इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतरही ईश्वरचरणी लीन होणे ही खूप कठीण गोष्ट आहे. तुझ्या (अनुष्काच्या) ईश्वराप्रती असलेल्या भक्तीचा परिणाम त्याच्यावरही (विराट) झाला आहे, असे आम्हाला वाटते,” असे महाराज अनुष्काला उद्देशून म्हणाले. (Virat, Anushka)
नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेत अपयशी ठरल्यानंतर कोहली प्रेमानंद महाराजांना भेटायला आल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. भारताने १-३ अशा गमावलेल्या या मालिकेमध्ये त्याला केवळ १९० धावा करता आल्या होत्या. या अपयशी दौऱ्यानंतर त्याच्या व रोहित शर्माच्या कसोटीतून निवृत्तीची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे. विराट आणि अनुष्का हे दोघेही भगवान कृष्णाचे भक्त असून त्यांना यापूर्वीही विविध मंदिरात पाहण्यात आले आहे. (Virat, Anushka)
Virat Kohli and Anushka Sharma with their kids visited Premanand Maharaj. ❤️
– VIDEO OF THE DAY…!!! 🙏 pic.twitter.com/vn1wiD5Lfc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 10, 2025
हेही वाचा :