Vidarbha : विदर्भ, हरियाणा उपांत्य फेरीत

Vidarbh

बडोदा : करुण नायर आणि ध्रुव शौरीच्या शतकांमुळे विदर्भाने राजस्थानवर ९ विकेटनी विजय मिळवून हजारे करंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. रविवारच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या हरियाणाच्या संघाने गुजरातवर २ विकेटनी निसटता विजय मिळवला. (Vidarbha)

राजस्थानचे ८ बाद २९१ धावांचे लक्ष्य विदर्भाने ४३.३ षटकांमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. विदर्भाकडून सलामीवीर ध्रुव शौरी आणि कर्णधार करुण नायर यांनी नाबाद शतके झळकावली. ध्रुवने १३१ चेंडूंमध्ये १० चौकार व ३ षटकारांसह नाबाद ११८ धावांची खेळी केली. करुणने सलग चौथे आणि स्पर्धेतील एकूण पाचवे शतक ठोकताना ८२ चेंडूंमध्ये १३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद १२२ धावा फटकावल्या. तत्पूर्वी, शुभम गढवाल व कार्तिक शर्माच्या अर्धशतकांमुळे राजस्थानला २९१ धावा करता आल्या. विदर्भाच्या यश ठाकूरने ४ विकेट घेतल्या. उपांत्य फेरीत विदर्भासमोर महाराष्ट्राचे आव्हान आहे. (Vidarbha)

दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात गुजरातचा डाव प्रथम फलंदाजी करताना १९६ धावांत आटोपला. गुजरातकडून हेमांग पटेल वगळता कोणालाही अर्धशतक पूर्ण करता आले नाही. हेमांगने ६२ चेंडूंमध्ये २ चौकार व ५ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. हरियाणाकडून अनुज ठकराल व निशांत सिंधूने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरादाखल हरियाणाने चौतिसाव्या षटकापर्यंत ३ बाद १७३ धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र त्यांनी १९ धावांत ५ विकेट गमावल्याने सामना अटीतटीचा झाला. यांपैकी ३ विकेट रवी बिश्नोईने घेतल्या. अखेर दिनेश बना व अंशुल कुंबोज या नवव्या जोडीने ४४ व्या षटकात हरियाणाचा विजय साकारला. उपांत्य फेरीत हरियाणाचा सामना कर्नाटक संघाशी होईल. (Vidarbha)

  • संक्षिप्त धावफलक :
  • १. राजस्थान – ५० षटकांत ८ बाद २९१ (कार्तिक शर्मा ६२, शुभम गढवाल ५९, दीपक हुडा ४५, यश ठाकूर ४-३९) पराभूत विरुद्ध विदर्भ – ४३.३ षटकांत १ बाद २९२ (ध्रुव शौरी नाबाद ११८, करुण नायर नाबाद १२२, यश राठोड ३९, कुकणा अजय सिंह १-४०).
  • २. गुजरात – ४५.२ षटकांत सर्वबाद १९६ (हेमांग पटेल ५४, चिंतन गाजा ३२, अनुज ठकराल ३-३९, निशांत सिंधू ३-४०) पराभूत विरुद्ध हरियाणा – ४४ षटकांत ८ बाद २०१ (हिमांशू राणा ६६, पार्थ वत्स ३८, रवी बिश्नोई ४-४६, अर्झान नागावासवाला २-३४).

हेही वाचा :
महंमद शमीचे पुनरागमन

Related posts

Women’s Cricket : भारताची मालिकेत विजयी आघाडी

Ira Jadhav : मुंबईच्या इराची विक्रमी खेळी

Yograj Singh : कपिलला गोळी घालणार होतो!