वज्रासन

वज्रासनाचे  नाव हिरा किंवा वज्रच्या आकारावरून ठेवण्यात आले आहे. तर आसन म्हणजे बसणे. या आसनामुळे शरीरातील विखुरलेली उर्जा स्थिर होऊ शकते. याशिवाय शरीराला हिऱ्यासारखे कठोर बनवण्यातही हा योग प्रकार मदत करतो.  जेवनानंतर करता येणारे हे एकमेव आसन आहे.

कृती

वज्रासन करण्यासाठी सर्वप्रथम पाय वाकवून गुडघ्यावर बसावे. त्यानंतर तुमच्या पायांचे पंजे उलट्या स्थितीत मागे खेचावेत त्यांना एकत्रीत जोडून पायाचे अंगठे एकमेकांवर ठेवावेत. त्यानंतर हळूहळू तुमचे शरीर खाली घ्यावे. छाती पायाच्या घोट्यावर घ्यावी. तुमच्या मांड्या तुमच्या पोटरीच्या स्नायूंवर स्थिरावतील. त्यानंतर दोन्ही हात गुडघ्यावर घ्यावेत. तसेच डोके सरळ ठेवून नजर एकदम समोर ठेवावी. यावेळी श्वास घेताना आणि बाहेर सोडताना श्वासांवर काळजीपुर्वक लक्ष ठेवावे. डोळे बंद करावेत आसन सुरुवातीला किमान ५ मिनिटे आणि जास्तीत जास्त १० मिनिटे करता येते. या आसनाचा सराव होईल तसे तुम्ही ३० मिनिटांपर्यंत वेळ वाढवू शकता.

वज्रासनाचे फायदे –

  • शरीरातील पचनसंस्थचे कार्य सुधारते, पोटाच्या तक्रारीसाठी फायदेशीर
  • शरीरातील मांसपेशी मजबूत करतात
  • पायांना बळकटी प्राप्त होते
  • शरीर वज्रासारखे होते.
  • गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.

Related posts

पोटातले ओठावर!

हिंदुदुर्ग!

Lok Sabha : खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ