Home » Blog » अमेरिकेने प्रोजेक्ट फ्रीडम मोहिम थांबवली; होर्मुझ वाहतुकीचा मार्ग खुला?

अमेरिकेने प्रोजेक्ट फ्रीडम मोहिम थांबवली; होर्मुझ वाहतुकीचा मार्ग खुला?

0 comments
United States has halted the 'Project Freedom' campaign

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोजेक्ट फ्रीडम मोहिम थांबवण्याची घोषणा केली. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या व्यापारी जहाजांना बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (United States has halted the ‘Project Freedom’ campaign)

मध्यपूर्वीतील सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी इराणसोबत एक व्यापक करार घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असून त्यासाठी प्रोजेक्ट फ्रीडम थांबवण्याचा निर्णय घेता असल्याचे ट्रम्प यांनी संगितले. पाकिस्तान आणि इतर देशांकडून आलेल्या विनंत्यांचाही त्यांनी उल्लेख केला. ‘ट्रुथ सोशल’वर या निर्णयाची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले “पाकिस्तान आणि इतर देशांच्या विनंतीनुसार, इराण देशाविरुद्धच्या मोहिमेदरम्यान आम्हाला मिळालेले प्रचंड लष्करी यश आणि त्याव्यतिरिक्त, इराणच्या प्रतिनिधींसोबत संपूर्ण आणि अंतिम कराराच्या दिशेने झालेली मोठी प्रगती, या बाबी लक्षात घेऊन आम्ही परस्पर सहमतीने ठरवले आहे की, नाकेबंदी पूर्णपणे लागू असताना, ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ थोड्या कालावधीसाठी थांबवला जाईल, जेणेकरून हा करार अंतिम करून त्यावर स्वाक्षरी करता येते की नाही हे पाहता येईल. ” (United States has halted the ‘Project Freedom’ campaign) जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी महामार्गावरील होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी ट्रम्प यांनी ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ हा उपक्रम म्हणून जाहीर केला. इराण अमेरिका संघर्षात थेट सहभागी नसलेल्या देशांच्या जहाजांना, अमेरिकेच्या नौदल आणि हवाई दलाच्या साधनांनी एक संरक्षक मार्ग तयार करून, त्या प्रदेशातून सुरक्षितपणे बाहेर काढणे हा होता. अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या जहाजांना आणि कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी, तसेच जागतिक व्यापार प्रवाहात गंभीर व्यत्यय येणार नाही याची खात्री करण्यासाठी, ट्रम्प यांनी याला एक ‘मानवतावादी कृती’ म्हटले होते. तथापि, या कारवाईमुळे तणावही वाढला, कारण अमेरिकेने जहाजांना धोका निर्माण करणाऱ्या अनेक इराणी बोटी बुडवल्याचा दावा केला, तर दुसरीकडे या प्रदेशात नागरी जहाजांवर हल्ले झाल्याचे वृत्त समोर आले. (United States has halted the ‘Project Freedom’ campaign

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00