Home » Blog » Jaishankar clarifies: दहशतवाद सहन करणार नाही : जयशंकर

Jaishankar clarifies: दहशतवाद सहन करणार नाही : जयशंकर

by प्रतिनिधी
0 comments
Jaishankar clarifies

नवी दिल्ली : भारत दहशतवादाविरुद्ध ‘शून्य सहनशीलता’धोरण अवलंबत आहे. आम्ही कधीही वाईट कृत्य करणाऱ्यांना सहन करणार नाही, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी (७ जून) यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांच्याशी त्यांची व्यापक चर्चा झाली. या चर्चेदरम्यान ते बोलत होते. (Jaishankar clarifies)

गेल्या महिन्यांत झालेल्या चार दिवसांच्या संघर्षानंतर अनेक देशांनी भारत आणि पाकिस्तानला हायफनेशन केल्यामुळे नवी दिल्लीत अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचे हे विधान आले.

दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंचा आढावा घेण्यासाठी श्री. लॅमी शनिवारी सकाळी दोन दिवसांच्या दौऱ्यावर नवी दिल्लीत पोहोचले. (Jaishankar clarifies)

आपल्या टेलिव्हिजनवरील भाषणात, श्री. जयशंकर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल आणि भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला लंडनने दिलेल्या पाठिंब्याबद्दल ब्रिटनचे आभार मानले.

“आम्ही दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण पाळतो आणि आमच्या भागीदारांनी ते समजून घ्यावे अशी अपेक्षा करतो. आम्ही कधीही वाईट कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही,” असे ते म्हणाले.

जयशंकर यांनी अलीकडेच अंतिम झालेल्या भारत-यूके मुक्त व्यापार करार आणि दुहेरी योगदान कराराचे वर्णन ‘खरोखर एक मैलाचा दगड’ असे केले. (Jaishankar clarifies)

यावेळी भारताने, पाकिस्तानकडून सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केल्याचे कळते.

गेल्या महिन्यात झालेल्या लष्करी संघर्षादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी ब्रिटन हा दोन्ही देशांच्या संपर्कात होता. लॅमी यांनी १६ मे रोजी इस्लामाबादचा दोन दिवसांचा दौरा केला. त्यादरम्यान त्यांनी १० मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी कारवाया थांबवण्यासाठी झालेल्या सामंजस्य कराराचे स्वागत केले होते.

हेही वाचा :
महाराष्ट्रानंतर बिहारात ‘मॅच फिक्सिंग’
मोदींकडून निर्लज्जपणे ‘सिंदूर’ चे राजकारण : तृणमूल

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00