महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी मंजूर केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्रीमंडळाने बैठकीत मंजुरी दिली. याबाबतची माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. (Ahilyanagar)
केंद्रीय मंत्री मंडळाने बैठकीत घेतलेल्या निर्णयानंतर अहमदनगर जिल्याचे नामांतर ‘अहिल्यानगर’ असे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याची माहिती राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर दिली आहे. या निर्णयाबाबत मंत्री पाटील म्हटले आहे, ‘अहमदनगरच्या नामांतराची वचनपूर्ती केंद्र सरकारने केल्यामुळे मनस्वी आनंद होत आहे. या निर्णयासाठी सहकार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनापासून आभार मानतो.
हेही वाचा :