कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्याच्या प्रमुखांनी नुकतेच कोल्हापुरात येऊन कोल्हापूरसाठी ४५०० कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रम घेत फसवणूक केली असल्याचा आरोप शिवसेना उपनेते संजय पवार यांनी केला. शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उद्घाटन केलेल्या कामांची मंजुरीपत्रे दाखविण्याची मागणी केली. (Kolhapur News)
यावेळी संजय पवार म्हणाले, जी कामे प्रसिद्ध केली आहेत. त्यातील अनेक कामांची निविदा प्रक्रियाही झालेली नाही. त्यामुळे ठेकदार निश्चितीचा प्रश्नच उद्भवत नाही. ३२०० कोटी, २७७ कोटी, १५२ कोटी, १३२ कोटी, २५ कोटी अशा रकमा आणि त्यासंदर्भातील अनेक कामांचे डिपीआर करण्याचे काम सुरू असल्याचे समजते. मग नेमका विकास कोणाचा झाला, १८ टक्केवाल्याचा की कोल्हापूरचा, असा सवालही संजय पवार यांनी केला.
त्यावर जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी यांपैकी जिल्हा नियोजनातील कामे खूप कमी आहेत. बाकी कामे महापालिका हद्दीत असल्याने महापालिका अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेतील आहेत, असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कागदपत्रे दाखवण्याचा आग्रह केला. यावर शेवटी सोमवारी उपलब्ध कागदपत्रे दाखवण्यात येतील, असे विजय पवार यांनी सांगिगतले. त्यानंतर निवेदन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले. (Kolhapur News)
आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, विशाल देवकुळे, महेश उत्तुरे, अवधूत साळोखे, धनाजी दळवी, दिलीप देसाई, स्मिता सावंत, पूनम फडतरे आदींचा सहभाग होता.
आंदोलनात दुर्बिण आणि घागर
शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे जिल्हाधिकारी कार्यालयात येतानाच दुर्बीण तसेच रिकामी घागर आणि नारळ घेऊन आले होते. ४५०० कोटी रुपयांची कामे कुठे कुठे करणार आहेत, हे पाहण्यासाठी आम्ही दुर्बीण घेऊन आलो आहोत, असे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :