नवी दिल्ली : लग्नानंतर ती सासरी गेली, पण तिचा छळा होऊ लागला. तरीही तिने सहन केले. वडाळा सासर असलेले कुटुंब इंग्लंडला गेले. तेथे तर तिला अनन्वित अत्याचाराला सामोरे जावे लागले. ती परत आली. कहर म्हणजे नवऱ्याने तिला व्हिडीओ कॉल केला आणि तिहेरी तलाक दिला. (Triple Talaq)
मुंबईतील सीवूड्स येथील रहिवासी असलेल्या पीडितेने यासंबंधी नवी मुंबईतील एनआरआय सागर पोलिस ठाण्यात तिने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) विधेयक आणि भारतीय न्याय संहिते (बीएनएस)नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.(Triple Talaq)
तिचे लग्न २०२२ मध्ये मुस्लिम रितीरिवाजांनुसार आकिब भाटीवालासोबत थाटात झाले. वडाळा येथील सासरच्या घरी गेल्यानंतर तिचा छळ सुरू झाला. त्यानंतर ती पती आणि सासरच्या लोकांसह इंग्लंडला गेली तेव्हा परिस्थिती आणखी बिघडली. तिथे तिच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. घरगुती वाद टोकाला गेला. पतीने तिचे दागिने बळकावले. बोलणे बंद केले आणि तिला भारतात परत पाठवले. कहर म्हणजे व्हिडिओ कॉल करून तिहेरी तलाकद्वारे घटस्फोट घेतला. ती पुन्हा इंग्लंडला गेली. त्यावेळी तिला घरात घेण्यास नकार दिला.(Triple Talaq)
पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. इस्लामिक कायद्यानुसार, तीन वेळा ‘तलाक’ उच्चारून पतीला आपल्या पत्नीचा घटस्फोट देण्याची परवानगी आहे.
तथापि, ऑगस्ट २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाद्वारे ही प्रथा असंवैधानिक मानली गेली. २०१९ मध्ये मुस्लिम महिला (विवाह अधिकारांचे संरक्षण) कायद्याने तिहेरी तलाक हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात आला. असे कृत्य करणाऱ्या दोषीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.