Tirupati Stampede : पाच मिनिटे श्वासही घेता येत नव्हता!

Tirupati Stampede

Tirupati Stampede

हैदराबाद : ती पाच मिनिटे अक्षरश: भयंकर होती. माणसांची भिंत एकदम फुटून एकमेकांच्या अंगावर जणू कोसळलीच. आम्ही आता मरणार, असे वाटत होते. मला बराच वेळ श्वासही घेता आला नाही,’ असा भयंकर अनुभव डी. व्यंकट लक्ष्मी या महिलेने सांगितला. बुधवारी संध्याकाळी तिरुपती येथे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला. ४० वर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Tirupati Stampede)

प्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात वैकुंठद्वार दर्शनासाठी तिकीट काढण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. त्यावेळी चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना घडली. या चेंगराचेंगरीतून वाचलेल्यांनी आपले अनुभव सांगितले. आजही त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड दडपण आणि भीतीचे सावट दिसत होते.

या अनागोंदीसाठी भाविकांनी अधिकाऱ्यांच्या गैरव्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. लोक उन्मादात पुढे आले आणि ते एकमेकांवर अक्षरश: कोसळले.  माझ्यासमोरच जवळपास दहा लोक पडले. अशा अवस्थेतही लोक त्यांना चिरडून पुढे जात होते, असे लक्ष्मी सांगतात. गेली २५ वर्षे त्या दर्शनासाठी येतात.

काही होतेय समजत नव्हते, गर्दीमुळे श्वास घेणेही मुश्कील होते. दम लागला आता मी आणि माझ्याजवळ असलेले मरणार असेच वाटत होते. तोपर्यंत मला काहीजणांना गर्दीतून बाहेर ओढून घेतले. त्यामुळे मी चेंगराचेंगरीतून वाचले. काही तरुणांनी पाणी दिले, असे त्यांनी सांगितले. (Tirupati Stampede)

गर्दीच्या ठिकाणी पोलीस होते, मात्र ते बाहेर होते. रांगेतून जा, अशा सूचना देण्यात येत होत्या, पण कुणी ऐकायला तयार नव्हते, ती म्हणाली. आणखी एका भाविकाने, मंदिराचे दरवाजे संध्याकाळी ७ वाजता अनपेक्षितपणे उघडले, त्यामुळे लोक एकदम धावले. त्याची परिणती चेंगराचेंगरीत झाली, असा आरोप केला. (Tirupati Stampede)

सणासुदीच्या काळात दु:खद घटना

वैकुंठद्वार दर्शन सोहळ्यासाठी देशभरातील भाविक येतात. दहा दिवस हा धार्मिक सोहळा सुरू राहतो. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या दु:खद घटनेने देवस्थान व्यवस्थापन समितीवर आव्हान निर्माण केले आहे. तिरुपती मंदिराची लोकप्रियता देशभर आहे. तथापि, ही जीवघेणी चेंगराचेंगरी गर्दीच्या वेळी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी होणाऱ्या धोक्याची जाणीव करून देणारी होती. प्रचंड गर्दीवेळी अपुऱ्या पायाभूत सुविधांसह गर्दी नियंत्रण कशी करणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मंदिर व्यवस्थापन समितीसह कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दोन अधिकारी निलंबीत

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. तसेच दोघा अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आणि तिघा अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले. तसेच मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी २५ लाखांची नुकसान भरपाई आणि जखमींसाठी प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली. नायडू यांनी रुग्णालयांत जाऊन रुग्णांची विचारपूसही केली.

हेही वाचा :

 ‘या’ संशोधनासाठी नऊ कोटींचे बक्षीस

Related posts

India’s major decisions

India’s major decisions: सिंधू करार स्थगित, अटारी चेक पोस्ट बंद

Luxury Goods

Luxury Goods : महागड्या वस्तू घेताय?… १% टीसीएस लागू

Rajnath

Rajnath : आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू