Tirupati : तिरुपती मंदिरामध्ये आग

Tirupati Fire

तिरुपती : तिरुपतीमधील भगवान व्यंकटेश्वरा मंदिरामध्ये सोमवारी दुपारी लाडवाच्या काउंटरजवळ आग लागली. मंदिर प्रशासनाने ही आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने प्रयत्न केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. (Tirupati)

तिरुपती परिसरातील व्यंकटेश्वरा मंदिरामध्ये १० दिवसांचा वैकुंठद्वार दर्शनम् हा उत्सव सुरू आहे. या उत्सवामुळे रोज हजारोंच्या संख्येने भाविक या मंदिरास भेट देत आहेत. या मंदिरात प्रसाद म्हणून लाडू देण्यात येतात व त्याच्या वितरणासाठी काउंटर उभारण्यात आले आहेत. यापैकीच ४७ क्रमांकाच्या लाडवाच्या काउंटरजवळ ही आग लागली. अखंडित वीजपुरवठा व्यवस्थेमध्ये (यूपीएस) शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग दिसताच भाविकांची तारांबळ उडाली. मात्र, मंदिर प्रशासनाने तातडीने पावले उचलत ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे, आग इतरत्र फोफावली नाही. या आगीच्या घटनेबाबत अधिक तपास करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. (Tirupati)

काही दिवसांपूर्वीच वैकुंठद्वार दर्शनासाठी तिकीट केंद्राजवळ अचानक गर्दी उसळल्यामुळे चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ४० हून अधिक लोक जखमी झाले होते. (Tirupati)

हेही वाचा :
रशियाकडून लढणाऱ्या केरळच्या तरुणाचा मृत्यू

Related posts

Rahul Slams Modi : महागाई रोखण्यात मोदी अपयशी

Sanvidhan Bachao : काँग्रेसचे ‘संविधान वाचवा’ अभियान

Rooster Fight : कोंबड्यांच्या झुंजींवर कोटींचा सट्टा