Tibet Earthquake: शक्तिशाली भूकंपाने तिबेट हादरला!

Tibet Earthquake

झिगाझे (तिबेट) : शक्तिशाली भूकंपाने मंगळवारी तिबेट हादरून गेला. या भूकंपामुळे झालेल्या पडझडीत १२६ जणांचा मृत्यू झाला. जवळपास १८८वर लोक जखमी झाले आहे. या भूकंपाने तिबेट शेजारील नेपाळ, भूतान आणि भारताच्या सीमावर्ती भागही हादरवून टाकला. हिमालयाच्या उत्तरेकडील पायथ्याशी असलेल्या झिगाझे शहराजवळ हा भूकंप झाला. रिश्टर स्केटवर त्याची तीव्रता ६.८ इतकी होती. (Tibet Earthquake)

प्रादेशिक आपत्ती निवारण मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९:०५ वाजता (बीजिंग वेळ) चीनमधील तिबेट स्वायत्त प्रदेशातील झिगाझे येथील डिंगरी काउंटीला भूकंपाचा धक्का बसला. चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्राने दिलेल्या वृत्तानुसार भूकंपाची खोली १० किमी (६.२ मैल) होती.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, नेपाळ-तिबेट सीमेजवळील लोबुचेच्या ईशान्येला ९३ किमीवर असलेल्या ठिकाणी हा भूकंप झाला. भारत आणि युरेशिया प्लेट्स एकमेकांशी भिडतात तेथे भूकंपाचे केंद्र होते. येथे जगातील काही उंच शिखरांची उंची बदलण्याइतपत हिमालयातील पर्वतरांगांमध्ये उत्थान निर्माण होते.(Tibet Earthquake)

  • या तीव्र भूकंपाचे हादरे दिल्ली-एनसीआर आणि बिहारच्या काही भागांसह उत्तर भारतालाही जाणवले.
  • USGS अहवालानुसार, सकाळी ७ च्या सुमारास एका तासाच्या कालावधीत ४ ते ५ तीव्रतेचे किमान सहा हादरे नोंदवले गेले.
  • आजचा भूकंप २०० किलोमीटरच्या त्रिज्येत गेल्या पाच वर्षांत नोंदलेला सर्वांत शक्तिशाली भूकंप होता.
  • २०१५ मध्ये नेपाळमध्ये ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यात सुमारे ९००० लोक मरण पावले. २२,००० वर लोक जखमी झाले होते. तसेच अर्धा दशलक्षाहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली होती.
  • नेपाळ एका मोठ्या भूवैज्ञानिक फॉल्टलाइनवर आहे जेथे भारतीय टेक्टोनिक प्लेट आणि युरेशियन प्लेटमध्ये सतत मोठा दबाव राहतो.

 

Related posts

sudden hair loss : न भादरताच पडतंय टक्कल!

Mystery Volcano: दोनशे वर्षांनी उकलले गूढ

Delhi Pollution: दिल्लीची हवा विषारी