three drown: वकिलासह तिघांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

three drown

रमेश चव्हाण : आजरा : आजरा शहरालगतच्या चित्री नदीवरील परोली बंधाऱ्यात वकिलांसह तिघांचा बुडून मृत्यू झाला. तिघेही नाताळ सण साजरा करण्यासाठी आले होते. त्यांच्या मृत्यूने आजऱ्यातील ख्रिश्चन समाजावर शोककळा पसरली आहे. फिलिप अंतोन कुतिन्हो (वय ४० रा. पुणे), लॉईड पास्कोन कुतिन्हो (वय ३५),  ॲड. रोझिरियो अतोन कुतिन्हो अशी मृतांची नावे आहेत. आजरा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. (three drown)

आजरा शहरात ख्रिश्चन धर्मीयांची वस्ती आहे. नाताळ सणांसाठी परगावी काम आणि व्यवसायानिमित्त राहणारे ख्रिश्चन बांधव नाताळसाठी आजऱ्यात येतात. कुतिन्हो कुटुंबातील अनेक सदस्य २४ डिसेंबरला आजऱ्यात आले होते. २५ डिसेंबरला कुतिन्हो कुटुंबीयांनी नाताळ साजरा केला होता.(three drown

रविवारी (दि.२९ डिसेंबर) त्यांच्या नातलगांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होता. तो आटोपल्यानंतर झाल्यानंतर गावाबाहेर असलेल्या परोली बंधाऱ्यात पोहायला जाण्याचा निर्णय कुतिन्हो बंधूनी घेतला. या बंधाऱ्यावर आजरा गावातील अनेक मंडळी पोहायला जातात. दुपारी पोहत असताना तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यांचे मित्र आणि नातेवाईकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न निष्फळ ठरले. ते बुडाल्यानंतर स्थानिकांनी शोध घेतला असता दोघांचे मृतदेह मिळाले. त्यानंतर थोड्यावेळाने तिसरा मृतदेह मिळाला. (three drown

सध्या चित्री बंधाऱ्यातून पाणी सोडले असल्याने बंधाऱ्याजवळ भाग खोल झाल्याची माहिती पुढे आली आहे. फिलिप आणि ॲड. रोझिरियो हे सख्खे भाऊ आहेत. लॉईड चुलत भाऊ आहे. रोझारिओ कुतिन्हो हा आजरा न्यायालयात काम करतो. तर लॉईड कुतिन्हो हा नेव्ही मर्चंटमध्ये काम करत होता. तिघांनाही पोहायला येत होते की नाही, याची माहिती पोलीस घेत आहेत.

Related posts

murder : शेती करायला सांगताय, खूनच करतो!

मोशी येथे रविवारी इंद्रायणी साहित्य संमेलन

ट्रक गर्दीत घुसवला; दहा जणांचा मृत्यू