Municipal election ठाकरे गटाने मुंबई महापालिकेसाठी कंबर कसली!

uddhav thackrey

मुंबई : विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. प्रामुख्याने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी बुधवारपासून मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या बैठका होणार आहे. (Municipal election)

२९ डिसेंबरअखेर मुंबईतील विभागनिहाय पदाधिकाऱ्यांची बैठका घेणार आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडीमार्फत न लढता स्वबळावर लढण्याची शिवसैनिकांची इच्छा आहे. त्यासंबंधी या बैठकीत विचारविनिमय केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत विधानसभानिहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी वार्डनिहाय शाखाप्रमुख ते विभागप्रमुखांशी बातचीत केली होती. त्यानंतर या निरीक्षकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे २१ डिसेंबरच्या बैठकीत अहवाल सादर केला होता. मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाने स्वबळावर लढावी, असे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासाठी उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत.(Municipal election)

या बैठकीसाठी विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत. या बैठकीत महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसेच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीचे आयोजन करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात येणार आहे.

असे आहे बैठकांचे नियोजन

  • २६ डिसेंबर : बोरिवली , दहिसर , मागाठाणे , दिंडोशी, चारकोप, कांदिवली आणि मालाड विधानसभा
  • २७ डिसेंबर : अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, चांदिवली, कुर्ला, कलिना विधानसभा
  • २८ डिसेंबर : मुलुंड, विक्रोळी, भांडुप, मानखुर्द-शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, अनुशक्तीनगर, चेंबूर, सायन कोळीवाडा
  • २९ डिसेंबर : धारावी, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुबादेवी, कुलाबा

हेही वाचा :

लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लवकरच खात्यावर वर्ग होणार
विधानसभेवेळी मतदार याद्यांबाबत कसलाही घोटाळा झालेला नाही

Related posts

Rape and Murder : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या

climate : तीन दिवस गारपीट, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

congress session : बेळगावात काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन