Home » Blog » Thackeray interacts with farmers : शक्तीपीठ महामार्गाने शेतकरी भिकेला लागेल : उद्धव ठाकरे

Thackeray interacts with farmers : शक्तीपीठ महामार्गाने शेतकरी भिकेला लागेल : उद्धव ठाकरे

by प्रतिनिधी
0 comments
Thackeray interacts with farmers

जालना : प्रकल्पाची मागणी नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत. सुपीक जमिनी महामार्गात जात आहेत. शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकरी भिकेला लागेल, त्याला हातात भीक मागण्यासाठी कटोरा घ्यावा लागेल,  अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. उद्ध्व ठाकरे गेले चार दिवस मराठवाड्यावर दौऱ्यावर असून ते अतिवृष्टी शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. आज शनिवारी त्यांनी  जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात बांधावर जाऊन शेतकऱ्यांची चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारच्या धोरणाविरोधात टीकेचे आसूड ओढले. (Thackeray interacts with farmers)

अतिवृष्टीने शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे. तसेच शेतजमिनीतून शक्तीपीठ महामार्ग  नेला जात आहे. हा विकास नसून विनाश आहे. शक्तीपीठ महामार्गाची मागणी नसतानाही शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी महामार्गात जात आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत असा आरोपही त्यांनी केला.  (Thackeray interacts with farmers)

शक्तीपीठ महामार्गासाठी १२ कोटी बॅग सिमेंट लागणार असून या प्रकल्याचा नारळ फोडतानाच ८६ हजार कोटी रुपये खर्चाचे गणित मांडण्यात आले. या प्रकल्पासाठी सिमेंट अदानीकडून मागण्यण्यात येणार आहे. अदानीच्या सिमेंट कारखान्याला कल्याण डोंबिवलीजवळील मोठी जमीन दिली आहे. स्थानिक जनता प्रदूषण होणार असल्याने विरोध करत आहे. तरीही पंतप्रधानांनी नियम डावलून अदानी कंपनीला ती जमीन दिली आहे. सत्ताधाऱ्यांचे सगळं गणित तयार आहे. महामार्ग, सिमेंट आणि लाभार्थी एकाच रेषेत उभे आहेत, असा आरोप ठाकरे यांनी केला. (Thackeray interacts with farmers)

शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी गेल्यावर शेतकरी भिकेला लागणार आहे. त्याच्या हातात भिक मागण्यासाठी कटोरा घ्यावा लागणार आहे. शक्तीपीठ महामार्ग नसून व्यक्तीपीठ महामार्ग आहे. शेतकऱ्यांच्या विनाशावर विकास उभा केला जात आहे. या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध योग्य आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले. (Thackeray interacts with farmers)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00