Home » Blog » नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

by प्रतिनिधी
0 comments
Comparison between Pandit Nehru and Modi

मुंबई : प्रतिनिधी : शून्यातून भारत निर्माण करणाऱ्या पंडीत जवाहरलाल नेहरूंशी नरेंद्र मोदी यांची तुलना होऊच शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी केले. मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. त्यांनी पंडीत नेहरु आणि इंदिरा गांधींच्या कार्याचा आढावाही घेतला. (Comparison between Pandit Nehru and Modi)

पंतप्रधानपदावर राहण्याचा सर्वात जास्त काळ राहण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यांनी पंडीत नेहरुंचा पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम मोडीत काढला. भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाचा तुलना नेहरुंच्या कालखंडाशी होत असल्याने शरद पवार यांनी भाजपचा चांगला समाचार घेतला. मोदी यांचे नाव न घेता काही लोक यांच्यासारखा नेता झाला नाही असा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान होण्याआधी नेहरुंनी स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी लढले होते. त्यांनी देश संघटित केला. त्यांच्यामुळे देशात सुधारणेचे वारे वाहिले. त्यांच्यानंतर इंदिरा गांधी यांनी तेवढ्याच निष्ठेने देशाची सेवा केला. (Comparison between Pandit Nehru and Modi)

पवारांनी मंत्री गिरीश महाजनांना सुनावले

गिरीश महाजन यांनी पंजाबमधील एका कार्यक्रमात ऑपरेशन ब्लू स्टार हा इतिहासातील काळा दिवस आहे अशी टीका केली. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली. शरद पवारांनी महाजनांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. ऑपरेशन ब्लू स्टार हा इंदिरा गांधीचा मोठा त्याग होता असे सांगून पवार म्हणाले, शीख समाज देशाचा महत्वाचा भाग आहे. शीख बांधव देशासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असतात. सैन्यदलातही ते प्रत्येक जबाबदारी पेलतात. इंदिरा गांधी यांनी जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवली. त्यांनी देशाच्या प्रतिष्ठेशी कधीही तडजोड केली नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  

पंजाबमध्ये काल गेलेल्या मंत्र्याने शिखांवर काँग्रेस आणि देशाने अन्याय केल्याचे भाषण करुन दिशाभूल केली. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली. महाराष्ट्राच्या मंत्र्याने केलेले भाषण हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही अशा शब्दात शरद पवार यांनी महाजनांना सुनावले. (Comparison between Pandit Nehru and Modi)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00