Home » Blog » Ahmedabad Mayor : अहमदाबादचे महापौर मोदी की शहा ; उद्धव ठाकरेंचा टोला

Ahmedabad Mayor : अहमदाबादचे महापौर मोदी की शहा ; उद्धव ठाकरेंचा टोला

by प्रतिनिधी
0 comments
Ahmedabad Mayor

छत्रपती संभाजीनगर : अदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार का? असा प्रश्न विचारला असता अहमदाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांना अहमदाबादचा महापौर करावे लागेल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी खोचक टोला मारला. (Ahmedabad Mayor)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आलेत. त्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उठाबश्या सुरू असू मुंबई महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गटाची सत्ता आल्यावर अदित्य ठाकरे महापौर होतील, अशी चर्चा सुरू आहे. त्यावरुन आज मराठवाड्यातील पत्रकार परिषदेत अदित्य ठाकरे यांच्या महापौरपदाचा प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे यांनी या बातमीचा उगम कुठुन झाला हे मला जाणून घ्यायचे होते आणि आता ते मला कळाले आहे. या अफवेचा उगम संघातून झाला आहे असे ते म्हणाले. (Ahmedabad Mayor)

उद्धव ठाकरे म्हणाले, अहमदाबाद शहराचे नाव बदलायचे आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांना अहमदाबादचे महापौर करावे लागेल, अशी संघात चर्चा सुरू आहे. आता मला बघायचे आहे की अहमदाबादचा महापौर अमित शहा होणार कि नरेंद्र मोदी होणार असा खोचक टोला त्यांनी मारला. (Ahmedabad Mayor)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00